Sunday, March 1, 2026
Latest:
सोलापूर

तारापूर : येथील येथील गंगाई सपाटे शिक्षण संकुलात 1 मे महाराष्ट्र दिन व कामगार दिन निमित्त ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले

Spread the love

गंगाई सपाटे शिक्षण संकुलात महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहन.
तारापूर : येथील येथील गंगाई सपाटे शिक्षण संकुलात 1 मे महाराष्ट्र दिन व कामगार दिन निमित्त ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते प्रशालेचे मुख्याध्यापक महंमद शेख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.या कार्यक्रमानंतर प्रशालेतील इयत्ता पाचवी ते नववी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांचे वार्षिक निकाल पत्रकाचे वाटप करण्यात आले.या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रशालेचे मुख्याध्यापक महंमद शेख यांनी महाराष्ट्र दिनाचे महत्त्व व महाराष्ट्राची राज्य निर्मितीसाठी कार्य करणाऱ्या व्यक्ती व विविध सामाजिक संस्था याविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.
या ध्वजारोहण कार्यक्रमासाठी नागनाथ चव्हाण,महेश पाटील,विजय सातपुते,तानाजी नकाते,बाळू डाखोरे,बाबासाहेब कदम आदी पालक तर सिद्धेश्वर कसबे,मल्लिकार्जुन बामणे,संजय काळे,शिवा भुई परमेश्वर ननवरे,विलास डाखोरे,श्रीमती संध्या कदम श्रीमती वैशाली सोनटक्के व इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *