श्रद्धा संकुल येथे ग्रॅज्युएशन डे उत्साहात साजरा
श्रद्धा संकुल येथे ग्रॅज्युएशन डे उत्साहात साजरा
” ही आवडते मज मनापासूनी शाळा, लाविते लळा जशी ही माऊली बाळा,हस-या फुलांचा बाग जसा आनंदी, ही तशीच शाळा मुले येथे स्वच्छंदी ” याप्रमाणे श्रद्धा इंग्लिश मिडियम स्कूल व श्रद्धा विद्यामंदिर मोहोळ यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांच्या गुणगौरवाचा सोहळा नेत्रदीपक असा संपन्न झाला.या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे नूतन उपशिक्षणाधिकारी पदी नियुक्त झालेले बालाजी पाटील, संस्थापक अध्यक्ष सुनिल झाडे, मिलन ढेपे, धरती पाटील, संचालक मोहित झाडे सर उपस्थित होते.
श्रद्धा संकुल येथे शैक्षणिक वर्ष 2023 – 2024 यामध्ये चार ही परीक्षांमध्ये प्रथम क्रमांकांने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना “एकलव्य पुरस्कार ” देऊन व स्पर्धा परीक्षांमध्ये घवघवीत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व गुणपत्रक देऊन गौरविण्यात आले. यामध्ये Indian Tallent search ( ITS) या परीक्षेत कार्तिक गावडे या विद्यार्थ्यांने राज्यात तिसरा क्रमांक मिळविला. तसेच अनेक विद्यार्थ्यांनी जिल्ह्यात प्रथम वाघमोडे श्रेयश,द्वितीय माळी वैष्णवी तसेच Abacus या परीक्षांमध्ये ही विशेष प्राविण्य मिळविलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक मान्यवरांनी आपल्या भाषणातून केले व विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांविषयी मोलाचे मार्गदर्शन केले.
या विद्यार्थ्यांना श्रद्धा संकुलातील सर्व शिक्षकांनी मार्गदर्शन केले. स्पर्धा परीक्षांतील विद्यार्थ्यांना सुशिल आवताडे, मोहिनी कदम, अमृता बाबर, प्रियंका बंडगर, तस्मिला मुल्ला, स्वाती घोटणे, प्राजक्ता आवारे शाळा व्यवस्थापिका धरती पाटील, मिलन ढेपे यांनी विशेष मार्गदर्शन व नियोजन केले.
हा कार्यक्रम यशस्वीरित्या करण्यासाठी दोन्ही प्रशालेचे मुख्याध्यापक दिनेश नरळे, वीणा कदम शाळा समन्वयक पौर्णिमा सुरवसे पर्यवेक्षिका मोहिनी थोरात, तृप्ती कदम, विद्या पवार, मानसी पवार, सलमान मुल्ला, सागर लाड यांचे योगदान लाभले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सविता पाटोळे,प्रियंका सोंडगे तर आभार प्रदर्शन विद्या मानेयांनी केले.

