शिवसेना प्रदेश प्रवक्त्या ज्योती ताई वाघमारे यांच्या वतीने भव्य प्रचार रॅली
शिवसेना प्रदेश प्रवक्त्या ज्योती ताई वाघमारे यांच्या वतीने महायुतीचे उमेदवार रामभाऊ सातपुते यांच्या प्रचारार्थ सोलापूर शहर मध्य मधे ११ कॉर्नर सभा आणि आज भव्य प्रचार रॅली काढण्यात आले.
ज्योती ताई वाघमारे यांच्या माध्यमातून सोलापूर शहर मध्य मधे विविध भागात ११ कॉर्नर मीटिंग घेण्यात आले. यात १. जगजीवनराम वस्ती, २. कोनापुरे चाळ ३. महात्मफुले झोपडपट्टी, ३. न्यू जगजीवनराम वस्ती, ४. दुबई गल्ली, ५. ८५ गाळा मोदी, ६. नवोदित नगर. ७. कामगार चौक लष्कर, ८. बापूजी नगर, ९. विणकर वसाहत गांधी नगर, १०. रोटे काम्प्लेक्स, ११. कुमठा नाका.या ठिकाणी कॉर्नर मीटिंग घेण्यात आले, या मीटिंग साठी महिला आणि तरुणांची लक्षणीय उपस्थिती होती.
दी ५/५/२०२४ रोजी सकाळी १० वाजता शहर मध्य मतदार संघात महायुतीचे उमेदवार रामभाऊ सातपुते आणि शिवसेनेच्या प्रवक्त्या,स्टार प्रचारक ज्योती ताई वाघमारे यांच्या उपस्थितीत १५०० नागरिकांची भव्य पदयात्रा काढण्यात आले, मोदी येथील दुर्गामाता मंदिर येथे पूजा करुन पदयात्रेला सुरुवात करण्यात आली तेथून ८५ गाळा, दुबई गल्ली, न्यू जगजीवनराम वस्ती,मासीह चौक, महात्माफुले वस्ती, शिवाजी नगर, जगजीवनराम झोपडपट्टी,मोची हाऊसिंग सोसाइटी, चिंतलवर वस्ती, मोदी गणपती मंदिर, अष्टभूजा मंदिर, मोदी रिक्षा स्टॉप, पंखा बावडी, येथून युवासेनेचे जिल्हाप्रमुख प्रियदर्शन भैया साठे यांच्या कार्यालयाकडे समारोप करण्यात आले, या पदयात्रेत जिल्हाप्रमुख प्रियदर्शन साठे, भाजपा चे शहर प्रमुख नरेंद्र काळे,भाजपा चे संतोष कदम, मरेप्पा कंपाली, दीपक पाटील, शिवराय साखरे,भिमा वाघमारे,भीमा मरेद्दी,सतीश म्हेत्रे,सचिन गुंटुनोलू, अंबादास हनमोलू,श्रीकांत गट्टू यांच्यासह शेकडो कार्यकर्त्ये उपस्थित होते.
