मागेल त्याला रस्ते – मागेल त्याला पाणी ” संकल्पनेचे सर्वेसर्वासिंघम आमदार रमेश कदम यांचे जनसेवा कार्यालय मोहोळमध्ये सुरू
“मागेल त्याला रस्ते – मागेल त्याला पाणी ” संकल्पनेचे सर्वेसर्वा
सिंघम आमदार रमेश कदम यांचे जनसेवा कार्यालय मोहोळमध्ये सुरू
जनसंपर्क कक्षाच्या माध्यमातून २४ तास जाणून घेणार सर्वसामान्यांच्या समस्या
मोहोळ प्रतिनिधी
मागेल त्याला पाणी मागेल त्याला रस्ते या उदात्त संकल्पनेतून केवळ सोलापूर जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण राज्याच्या नकाशावर चर्चेत आलेले मोहोळचे सिंघम माजी आमदार आणि सध्या कोणत्याही पक्षाच्या संपर्कात न जाता तुर्तास वेट अँड वॉचच्या भूमिकेत असलेले माजी आमदार रमेश कदम यांनी मोहोळ विधानसभा मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी मोहोळ येथे जनसेवा कार्यालयाची निर्मिती केली आहे. या अत्याधुनिक कार्यालयातील जनसंपर्कचा कक्षाचा मोठा फायदा मतदारसंघातील जनतेला होत आहे. असून दर आठवड्याला उपस्थित राहून ते सर्वसामान्यांच्या रस्ते, पाणी, आरोग्यविषयक समस्या जाणून घेत आहेत. या ठिकाणी दररोज नागरिकांची विविध निवेदने आणि लेखी मागण्या संकलित करण्याच्या अत्याधुनिक कक्षाची सोय माजी आमदार कदम यांनी केली आहे. मोहोळ मतदारसंघातील जनतेने दिलेले प्रेम मी कधीही विसरू शकणार नाही. त्यामुळे शासन दरबारी प्रयत्नशील तर राहूच मात्र नागरिकांना रस्ते पाणी आरोग्य या सुविधा तात्काळ देऊ शकणारी समांतर यंत्रणा पुन्हा उभी करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत असे अभिवचन यावेळी कदम यांनी दिले. मायबाप जनतेला सदैव दिलासा देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे सिंघम माजी आमदार कदम यांनी सांगितले.
यावेळी शशिकांत कसबे, दीपक थोरात, विठ्ठल सरवदे,सुधीर खंदारे यांच्यासह सिंघम आमदार रमेश कदम युथ फाऊंडेशनचे सर्व सदस्य उपस्थित होते.
चौकट
अनेक वर्ष मतदारसंघात उपस्थित नसतानाही गत विधानसभा निवडणुकीत पंचवीस हजार मते खेचून घेणाऱ्या माजी आमदार रमेश कदम यांची क्रेझ मतदारसंघातील आजही कायम आहे. मोहोळ मतदारसंघातील पाणीपुरवठ्याची अवस्था सध्या अतिशय बिकट आहे. दुष्काळी आणि अव्हानात्मक परिस्थितीत प्रत्येक समस्याकडे राजकारण म्हणून न पाहता सर्वसामान्यांना दिलासा मिळणे गरजेचे आहे. या प्रांजळ भावनेतुन ते मोहोळ मतदारसंघाच्या विविध भागात भेटी देत आहेत. जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या जात असुन लवकरच संपूर्ण मतदारसंघात पुन्हा मागेल त्याला पाणी हे अभियान प्रभावीपणे राबवणार असल्याचे त्यांनी सांगितले.


