श्रध्दा संकुलाचा नवोपक्रम “झाडे लावूया, पृथ्वीचे संवर्धन करुया”
वृक्षवल्ली आम्हां सोयरे, वनचरे । पृथ्वीवरील जागतिक तापमानवाढ, प्रचंड होत असलेली वृक्षतोड आणि त्यामुळे भासत असलेली ऑक्सिजनची कमतरता या सर्व बाबींचा विचार करून श्रध्दा संकुल यांनी 1000 झाडांचे वृक्षारोपण करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. मोहोळ व परिसरातील गावांमध्ये झाडांचे महत्त्व सांगून वृक्षारोपण केले जात आहे. या उपक्रमा अंतर्गत सौंदणे व तांबोळे या ठिकाणी श्रद्धा संकुलाच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. झाडांचे महत्त्व यावर आधारित प्रशालेचे विद्यार्थी नूतन शिंदे, यूक्ता हंचे, समृद्धी वसेकर यांनी आपले मनोगतातून झाडांचे महत्त्व पटवून दिले. याप्रसंगी सौंदणे गावचे सरपंच परमेश्वर माने व तांबोळे येथील ग्रामस्थ मोठयासंख्येने उपस्थित होते. या उपक्रमात श्रध्दा इंग्लिश मिडियम स्कूलचे 200 विद्यार्थी, श्रद्धा संकुलाचे मिलन ढेपे, उपक्रमशिल शिक्षक सलमान मुल्ला, अमोल गावडे, सागर लाड, अजित जाधव, विद्या पवार, महानंदा गाढे ,तृप्ती कदम, विद्या माने व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहभाग घेतला होता.
