४५ कोटी निधीतून चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपूरी तालुक्यातील अड्याळ जाणी येथे भव्य असे विपश्यना केंद्र उभे राहणार आहे. या केंद्राच्या भूमी पूजनाचा भव्य सोहळा आंतरराष्ट्रीय भंतेजी, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, खासदार प्रणितीताई शिंदे व इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

🔵👉 साम दाम दंड भेद, इडी सीबीआय वापरून ही जनतेच्या पाठिंब्याने महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत विजय लोकशाहीचा झाला, भाजप आणि पन्नास खोक्यांचे सरकार खाजगीकरण करून आरक्षण संपवित आहे. मागासवर्गीयांचा निधीही पळवित आहे :- प्रणिती शिंदे
यावेळी तथागत गौतम बुद्ध यांच्या ५१ मुर्त्यांचे वितरण करण्यात आले
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार होते.
कार्यक्रमात प्रमुख उपस्थितांमध्ये थायलंड येथील वाट साकेत धम्म स्कुल राॅयल मठ पाली विभागाचे प्रोफेसर डॉ.फ्रामहा फोंगसाथोर्न धम्मभणी, पाली विभागाचे प्रा.फ्रामाहा सुपाचै सुयानो हे उपस्थित होते.
तर मुख्य अतिथी म्हणून खा.प्रणिती शिंदे, खा.बलवंत वानखेडे, खा.नामदेव किरसान, कॅप्टन नटिकेट थायलंड, सिने अभिनेता गगन मलिक, काॅंग्रेसच्या अनुसूचित जाती सेलचे प्रदेशाध्यक्ष सिध्दार्थ हत्तीअंबीरे उपस्थित होते.