Sunday, October 12, 2025
Latest:
सोलापूर

टाकळी सिकंदर येथे विद्यार्थ्यांना 250 कॅम्लिन कंपास पेटी चे वाटप प्राध्यापक संग्राम दादा चव्हाण

Spread the love

टाकळी सिकंदर येथे विद्यार्थ्यांना 250 कॅम्लिन कंपास पेटी चे वाटप
78 वा भारतीय स्वातंत्र् दिनाचे औचित्य साधून श्री. समीर चव्हाण व प्रा. संग्रामदादा चव्हाण तसेच श्री.जोतिबा पेट्रोलियम किसान सेवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने टाकळी सिकंदर येथील जिल्हा परिषद प्रशाला व श्री.मनोहर भाऊ डोंगरे प्रशाला या दोन्ही शाळांमध्ये गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना कॅम्लीन ब्रँडच्या 250 कंपास पेटी चे वाटप करून शालेय विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाची स्नेहभेट देण्यात आली.यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांमध्ये बोलताना प्रा.संग्राम दादा चव्हाण म्हणाले की शेतकरी वाईट परिस्थिती मधून जात असून शेतकऱ्यांच्या व मध्यमवर्गीयांच्या मुलांना सध्याच्या आपल्या आर्थिक परिस्थितीचे चित्र बदलून कुटुंबासाठी वैभवशाली भविष्य निर्माण करायचे असेल तर विद्यार्थ्यांनी उन्हामध्ये काबाडकष्टाने करपलेल्या आई-बापांच्या चेहऱ्याची मनात जाणिव ठेवत मन लावून अभ्यास केला पाहिजे व सरकारी अधिकारी,डॉक्टर इंजिनीयर,शिक्षक, प्राध्यापक, होण्यासाठी आपल्या वेळेचं,अभ्यासाचं काटेकोर नियोजन करून जीवाचं रान केलं पाहिजे. तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या विद्यार्थ्यांनी व्यसनांसारख्या प्रलोभनांना बळी न पडता,मोबाईल फोनचा योग्य कारणासाठी माफक वापर करत आपल्या शिक्षकांच्या ज्ञानाचा व अनुभवाचाही फायदा करून घेतला पाहिजे. शिक्षकांची विद्यार्थ्यांच्या जडणघडणीमध्ये महत्त्वाची भूमिका असते. कॅम्लिन कंपास पेटी ची स्नेहभेट मिळाल्यामुळे विद्यार्थी आनंदात दिसत होते. याप्रसंगी श्री. हर्षवर्धन पाटील यांचे सह सर्व शिक्षक वृंद तसेच शालेय समितीचे सदस्य व पालक उपस्थित होते. मुख्याध्यापक श्री. जगताप व श्री. सुनील डोके,श्री. अतुल येवले यांनी प्रा.संग्राम चव्हाण व समीर चव्हाण यांचे आभार मानले. यावेळी श्री एम के जाधव साहेब श्री. रसूल भाई मुलानी श्री.रामभाऊ हराळे श्री.अनिल चव्हाण श्री.राजाभाऊ वसेकर इत्यादी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *