श्रद्धा संकुल येथे वक्तृत्व स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न.
श्रद्धा संकुल येथे वक्तृत्व स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून श्रद्धा इंग्लिश मीडियम स्कूल आणि श्रद्धा विद्या मंदिर मोहोळ यांच्या संयुक्त विद्यमाने वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उत्कृष्ट सूत्रसंचालक प्रमोद कोरे संस्थेचे सचिव सुनील झाडे प्रमुख मान्यवर मोहित झाडे , मिलन ढेपे ,धरती पाटील दोन्ही प्रशालेचे मुख्याध्यापक फुलचंद साळुंखे विणा कदम हे उपस्थित होते. विद्यार्थ्यांमध्ये सभाधीटपणा, वाचनाची आवड निर्माण व्हावी. यासाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते विद्यार्थ्यांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला. स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह व गुणपत्रक देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.याप्रसंगी प्रमुख पाहुणे यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी आपले विचार व्यक्त करताना माझा देव माझे आई-वडील, शेतकरी नसता तर ! मोबाईलचे दुष्परिणाम,पर्यावरण रक्षण काळाची गरज या विषयांवर आपले विचार व्यक्त केले.स्पर्धेचे परीक्षक म्हणून शिवाजी वाघमारे व अमोल गावडे यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वीरित्या पार पडण्यासाठी विद्या पवार, तृप्ती कदम,महानंदा गाडे, सुलभा देठे, स्वप्नाली डोंगरे,विद्या माने, अजित जाधव सागर लाड ,श्री गोविंद धोत्रे, रोहित करे व दोन्हीही प्रशालेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे योगदान लाभले.
