Sunday, October 12, 2025
Latest:
सोलापूर

शेतकऱ्यांच्या प्रमुख अडचणीवर भर देऊनपाणी, शिक्षण आणि रस्ते या समस्यांवरती काम करणार–अनिल सावंत

Spread the love

शेतकऱ्यांच्या प्रमुख अडचणीवर भर देऊन
पाणी, शिक्षण आणि रस्ते या समस्यांवरती काम करणार–अनिल सावंत

अनिल सावंत यांचा संपर्क दौरा व पदयात्रा निमित्ताने गावांना भेट दिली असता गावकऱ्यांनी त्यांचे उत्साहात स्वागत केले

देशाचे नेते शरद पवार साहेब यांना केंद्रीय कृषिमंत्री असताना राज्यातील तसेच देशातील शेतकऱ्यांच्या काय अडीअडचण असतात याची त्यांना जाण असल्याने पवार साहेबांच्या नेतृत्वात सर्वसामान्य व शेतकरी बांधवांच्या विकासासाठी परिवर्तनाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून या भागातील पाणी प्रश्न दूर करून पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणात असलेल्या पाणी, शिक्षण आणि रस्ते या समस्यांवरती काम करण्याची गरज आहे आणि याबाबत मी सर्वप्रथम जातीने लक्ष देऊन या भागाचे नंदनवन करण्याचा माझा मानस असून येत्या निवडणुकीत असंच सहकार्य करून ‘ तुतारी वाजवणारा माणूस ‘ या चिन्हासमोरील बटन दाबून विजयी करा असे आवाहन अनिल सावंत यांनी ग्रामस्थांना केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अनिल सावंत यांनी संपर्क दौरा व पदयात्रा या निमित्ताने केला. संपर्क दौरा व पदयात्रा या निमित्ताने महमदाबाद शेटफळ, लक्ष्मी दहिवडी, लेंडवे चिंचोळे , गणेशवाडी, अकोले आणि कचरेवाडी या गावांना भेट दिली. गावकऱ्यांशी चर्चा करताना ते बोलत होते.

यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अनेक मान्यवर देखील उपस्थित होते एकंदरीत अनिल सावंत यांना मंगळवेढा व पंढरपूर भागातून मिळणारा प्रतिसाद व महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती यावरून ग्रामस्थांचा पाठिंबा दिसून आला.
त्यावेळी ग्रामस्थांनी ‘विठ्ठलाचा तू वारकरी, विधानसभेचा तू मानकरी ‘ अशा प्रकारच्या घोषणा देऊन सर्व ग्रामस्थांनी आपला पाठिंबा अनिल सावंत यांना दर्शवला.
-०-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *