श्रद्धा संकुल मध्ये आय.टी.एस स्पर्धा परीक्षा निरोप समारंभ व पारितोषिक वितरण सोहळ्याचे आयोजन

दि. ११ जानेवारी 2025 रोजी श्रद्धा संकुल मध्ये आयटीएस निरोप समारंभ व पारितोषिक वितरण समारंभ जल्लोषात पार पडला. आजच्या स्पर्धात्मक युगात आपला पाल्य आत्मविश्वासपूर्वक, सकारात्मक मनस्थितीत अभ्यास करून यशस्वी व्हावा. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ व्हावी , स्पर्धा परीक्षेचे ज्ञान त्यांना आता पासून मिळावे व त्यांच्यातील स्पर्धा परीक्षेची भिती कमी व्हावी आणि विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास वाढावा. त्यासाठी श्रद्धा संकुल मध्ये विविध स्पर्धा परीक्षेचे आयोजन सतत चालू असते. विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी मुलांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले व पुढील स्पर्धा परीक्षेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. आयटीएस शिक्षिका तसलीम मुल्ला व संगीता राऊत यांनी मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष पदी संस्थापक सचिव सुनील झाडे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून राज्यस्तरीय कृषीभूषण शिखर आयकॉन अवॉर्ड पुरस्कृत आप्पा कारमकर हे मार्गदर्शक म्हणून या कार्यक्रमास लाभले. आय टी एस शिक्षिका प्रियंका सोंडगे, तसलीम मुल्ला , मीनाक्षी माने अमृता बाबर ,अश्विनी बंडगर, अर्चना पाचपुडं, स्नेहा जानराव यांना सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्या पवार व रूपाली कोकाटे यांनी केले तर आभार प्राजक्ता आरबळकर यांनी मानले.हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संचालक मोहित झाडे, प्रथमेश झाडे, व्यवस्थापक मिलन ढेपे, व्यवस्थापिका धरती पाटील, मुख्याध्यापिका वीणा कदम, मुख्याध्यापक फुलचंद साळुंखे, समन्वयक पौर्णिमा सुरवसे, मोहिनी थोरात, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक व विद्यार्थी यांचे मोलाचे योगदान लाभले.