राजीव गांधी माध्यमिक विद्यालय फुलचिंचोली–8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त प्रशालेमध्ये जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला
राजीव गांधी माध्यमिक विद्यालय फुलचिंचोली–8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त प्रशालेमध्ये जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष स्थानी सौ.सारिकाताई अमर पवार , प्रमुख पाहुणे सौ. सुनिताताई महादेव वाघ , तसेच प्रमुख उपस्थितीत सौ. स्वातीताई सचिन यादव , सौ.वर्षाताई नामदेव पवार , सौ. पल्लवीताई रमेश वाघ , सहशिक्षिका डोंगरे मॅडम उपस्थित होत्या. स्वागत समारंभा नंतर कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रमुख पाहुण्या , व उपस्थित महिलांच्या शुभ हस्ते फोटो पूजन करण्यात आले. नंतर आलेल्या सर्व महिलांचा गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. महिलांनी एकमेकींना हळदीकुंकू लावून एकमेकींचे स्वागत केले. त्यानंतर कुमारी. सायली मल्हारी जाधव इयत्ता नववी (अ )हिने आईचे महत्व सांगणारे एक गीत म्हटले. कुमारी. वैष्णवी नितीन जाधव इयत्ता सातवी हिने महिला दिनाचे महत्त्व व इतिहास सांगितला. इयत्ता सहावी मधील मुलींनी महिला दिना विषयी चारोळ्या गायल्या . कुमारी वैष्णवी शिवाजी पवार इयत्ता पाचवी हिने राजमाता जिजाऊ यांच्या बद्दल मत व्यक्त केले. त्यानंतर कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सौभाग्यवती सुनीताताई महादेव वाघ यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौभाग्यवती सारिका ताई अमर पवार यांनी महिला दिनानिमित्त आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री तोरकडे सर यांनी केले व कार्यक्रमाचे आभार श्री एम एम जाधव सर यांनी मानले. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. नकाते सर, श्री नागटिळक सर, श्री वाघ सर, श्री. एम. एम .जाधव सर, श्री डिसले सर श्री वाघमारे सर, श्री चव्हाण सर, श्री सुनील गाढवे पाटील सर, संचालक श्री.सचिन देशमुख, श्री सुदर्शन पाटील सर, श्री विकास देशमुख, श्री अनिल कुंभार शालेय पोषण विभागाच्या सौ.गायकवाड ताई व स्काऊट गाईड चे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम या राष्ट्रीय गीताने झाली.
