लेंगरे वस्ती शाळेत आरोग्य शिबीर व होम मिनिस्टर स्पर्धेने महिला मेळावा संपन्नग्रामपंचायत पोखरापूर व जि.प.प्रा.शा,लेंगरे वस्ती, पोखरापूर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त भव्य महिला मेळावा संपन्न झाला.
लेंगरे वस्ती शाळेत आरोग्य शिबीर व होम मिनिस्टर स्पर्धेने महिला मेळावा संपन्न
ग्रामपंचायत पोखरापूर व जि.प.प्रा.शा,लेंगरे वस्ती, पोखरापूर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त भव्य महिला मेळावा संपन्न झाला.
कार्यक्रमाचे उद्घघाटन
सौ.शितल सुशिलकुमार क्षीरसागर
व
सौ. नंदा समाधान नरुटे यांचे हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व राजमाता जिजाऊ प्रतिमापूजन करून करण्यात आले. स्वागत समारंभानंतर प्रास्ताविकामध्ये राजेंद्रकुमार वाघमोडे यांनी कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली.या प्रसंगी गावातील महिला व मुलींनी खुप छान भाषणे केली. प्रमुख पाहुण्या सौ.नंदा नरुटे यांनी काल, आज व उद्या आणि महिला यावर आपले विचार मांडले. अध्यक्षिय भाषणांमध्ये सौ.शितलताईनी महिला सक्षमीकरण यावर अतिशय सुंदर विचार मांडले.
यानंतर प्राथमिक आरोग्य उपकेंद्र पोखरापूर रवि जाधव व त्यांच्या सर्व टीमने महिलांची आरोग्य तपासणी केली. हिमोग्लोबीन, ब्लडप्रेशर, मधुमेह, ब्लड ग्रुप, सी.बी.सी. तपासणी व इतर सर्व आजारांची तपासणी केली.
दुपार सत्रामध्ये महिलांच्या क्रीडा स्पर्धा व विविध गुणदर्शन कार्यक्रम घेण्यात आले.स्पर्धे नंतर निकाल घोषीत करून व सौ. संगिता समाधान पाटील पोलीस पाटील पोखरापूर यांचे शुभहस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
होम मिनीस्टर विजेत्या सौ. मनिषा लेंगरे,सौ. उषा लेंगरे व सौ. आश्विनी लेंगरे-भैरवनाथ फर्निचर इलेक्ट्रॉनिक्स अँड भांडी सेंटर,मोहोळ व सौ.उज्वला वाघमोडे यांचे कडून पैठणी भेट देण्यात आल्या.
इतर विविध दहा क्रीडा स्पर्धेतील विजेत्या प्रथम व द्रितीय येणाऱ्या स्पर्धकांस बक्षिसे
विक्रम लेंगरे अध्यक्ष
दिलीप लेंगरे उपाध्यक्ष
शाळा व्यवस्थापन समिती
राजेंद्रकुमार वाघमोडे , दादासाहेब चव्हाण यांचे तर्फे देण्यात आली.
सदर
संपूर्ण कार्यकमाचे व क्रीडा स्पर्धेचे सुत्र संचालन सौ. सुचेता बाबर, कु.प्रतिक्षा लेंगरे यांनी केले.दादासाहेब चव्हाण यांनी आभार मानले.
शाळा व्यवस्थापन समिती ने भोजन व्यवस्था केली. सिद्धनागेश मार्बल मोहोळ, श्री. हनुमंत लेंगरे यांनी भोजना मध्ये स्वीट वाटप केले. श्री. राजेभाऊ चव्हाण यांनी मोफत भाजीपाला व श्री.संतोष ठोंगे यांनी विना मोबदला भोजन बनवून दिले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विक्रम लेंगरे, दिलीप लेंगरे ,किरण लेंगरे, द्रोणाचार्य लेंगरे, खेलूदेव लेंगरे, अनिल लेंगरे,द्वारकेश लेंगरे, विकास लेंगरे, हणमंत लेंगरे,विशाल लेंगरे मंडप कॉन्ट्रक्टर,तात्या शिंगाडे या पालकांनी व
प्रथमेश लेंगरे, सोमेश लेंगरे,सुजय लेंगरे, प्रतिक्षा लेंगरे, सौख्य लेंगरे,नागेश लेंगरे,चेतन लेंगरे,पांडू लेंगरे, प्रणाली लेंगरे, रोहीणी लेंगरे, प्रतिक्षा लेंगरे, अक्षदा लेंगरे,प्रगती लेंगरे श्रावणी लेंगरे, आर्यन लेंगरे, करण लेंगरे, अजिंक्य लेंगरे,करण बर्गे या स्वयंसेवकांनी ही खूप मदत व सहकार्य केले.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐