भारतीय जनता पार्टी मोहोळ उत्तर मंडल तालुकाध्यक्ष पदासाठी हॉटेल लोकसभा हॉल येथे निवडणूक प्रक्रिया यशस्वीपणे संपन्न झाली.
भारतीय जनता पार्टी मोहोळ उत्तर मंडल तालुकाध्यक्ष पदासाठी हॉटेल लोकसभा हॉल येथे निवडणूक प्रक्रिया यशस्वीपणे संपन्न झाली. निवडणूक अधिकारी मा. शशिकांत (नाना) चव्हाण व सरचिटणीस मा. मनिष (भैय्या) देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व खेळीमेळीच्या वातावरणात ही निवडणूक प्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. भारतीय जनता पार्टीच्या संस्कृतीनुसार लोकशाही पद्धतीने बूथ अध्यक्ष ते केंद्रीय अध्यक्ष निवड केली जाते. त्याच लोकशाही पद्धतीने आज तालुकाध्यक्ष पदाकरिता तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी व जुन्या कार्यकर्त्यांचे मत गुप्त पद्धतीने एका फॉर्मवर भरून लिफाफा बंद करून प्रदेश अध्यक्ष यांना पाठविण्यात आले आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये तेथून निवड घोषित करण्यात येईल.
यावेळी निवड प्रक्रियेमध्ये प्रदेश कार्यातून आलेल्या निर्देशनानुसार प्रत्येक इच्छुक तालुकाध्यक्ष पदासाठी उमेदवाराला सूचक अनुमोदन असा अर्ज भरून घेण्यात आला व सर्व इच्छुकांचे अर्ज बंद लिफाफ्यात प्रदेश कार्यालयास पाठवण्यात आले. त्याच सोबत या पदाकरिता पक्षाने 35 ते 45 वर्षाच्या वयाची अट ही ठेवण्यात आली आहे.
यावेळी सरचिटणीस शशिकांत (नाना) चव्हाण व मा. मनीष (भैय्या) देशमुख यांनी सर्व उपस्थित त्यांना मार्गदर्शन केले. सर्व इच्छुकांना शुभेच्छा ही दिल्या. त्यांच्या मार्गदर्शनामध्ये मोहोळ उत्तर मंडल तालुक्यातील पक्षाचे संघटन अधिक मजबूत होईल असा विश्वास भाजपा नगरसेवक सुशील क्षीरसागर यांनी व्यक्त केला.
या पदासाठी मा.सुशील क्षीरसागर, मा. सतीश काळे मा. अविनाश पांढरे, मा.सुरेश राऊत, मा. गणेश झाडे, मा. गुरुराज तागडे, मा.संतोष माने आदि पदाधिकाऱ्यांनी इच्छुक म्हणून अर्ज भरला.
याप्रसंगी प्रत्येक इच्छुक उमेदवारांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या आणि पार्टीच्या वतीने कुणालाही तालुकाध्यक्ष पद मिळालं तरी सर्वजण मिळून येणाऱ्या काळामध्ये मोहोळ उत्तर मंडलामध्ये भाजप आणखीन कसा वाढेल याकरिता सर्वजण मिळून आपण काम करू म्हणून भावना व्यक्त केल्या.
या प्रक्रियेस प्रमुख उपस्थितीमध्ये किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष मा. शंकरराव वाघमारे सरचिटणीस मा. विकास वाघमारे व युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मा. सुदर्शन यादव उपस्थित होते या सर्व मान्यवरांचा मोहोळ उत्तर मंडलाच्या वतीने स्वागत पर सत्कार करण्यात आला . तसेच मंडलातील जिल्हा पदाधिकारी मंडल पदाधिकारी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
