हभप तुकाराम बाबा महाराज यांच्या दिव्य सानिध्यात चैत्रवारीत प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी चिक्कलगी भुयार ते पंढरपूर पायी दिंडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, ज्ञानोबा माऊली तुकारामचा गजर चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थीना न्याय मिळवून देणारे हभप तुकाराम बाबा महाराज यांच्या दिव्य सानिध्यात चैत्रवारीत प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी चिक्कलगी भुयार ते पंढरपूर पायी दिंडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
राष्ट्रीय संत गाडगेबाबा, वैराग्यसंपन्न श्री संत बागडेबाबा यांच्या पावलावर पाऊल ठेवत समाजकार्यातून आपली वेगळी ओळख निर्माण करणारे तुकाराम बाबा महाराज यांनी २०१७ मध्ये चैत्र वारीला पायी दिंडी सुरु केली.
चार एप्रिलला चिक्कलगी भुयार मठापासून निघालेली पायी दिंडी जाल्याळ गुंजेगाव मार्गे सोमवारी रात्री पंढरपूरमध्ये झाली. या दिंडीत श्री संत सयाजी बागडेबाबा यांच्या १५ लाखाच्या सागवानी रथाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आकर्षक सजवलेल्या या रथात पालखी होती. शांतिलाल चव्हाण या भाविकांनी श्री स सव्वा किलो चांदीच्या पादुका अर्पण केल्या होत्या. मंगळवारी सकाळी बागडेबाबांच्या रथाची नगर प्रदक्षिणा सुरू झाली. या नगर प्रदिक्षणेत हजारो भाविक विठुनामाचा गजर करत सहभागी झाले होते. पालखीतील चांदीच्या पादुक्यास चंद्रभागा नदीत स्नान घालण्यात आले.
यावेळी हभप तुकाराम बाबा महाराज यांच्यासह हजारो भाविक या शिस्तबद्ध दिंडीत सहभागी झाले होते. दिंडी यशस्वी करण्यासाठी हभप अमृत पाटील महाराज, शांतिलाल चव्हाण, नितीन पाटील, दामाजी माळी, जक्काप्ऱ्या धगे, यशवत पाटील, अमृत पाटील, वास्तु शास्त्र तज्ञ सौ, सरिताताई लिंगायत, व्यंकटेश रजपूत, कृष्णा रजपूत, पांडुरंग पांढरे , परशुराम दरेकर, दत्तात्रय चौगुले, अवतोडे महारा, राजू चौगुले , सिद्राया मोरे, बसू बागेळी, नवनाथ मेटकरी, पिंटू मैढेदार, संगाणा हत्ताळी, संतोष चेळेकर, सतिश कारोजेंगी , आप्पू मलाबादी, ऋषिकेश दोरकर, शिवराज मेहेदार, गॅंगय्या स्वामी, चनप्पा आवटी यांनी परिश्रम घेतले.
■■