जरांगे पाटलांचे मराठ्यांना आवाहन भावी पिढीच्या कल्याणासाठी 29 ऑगस्ट रोजी मुंबईला चला
जरांगे पाटलांचे मराठ्यांना आवाहन
भावी पिढीच्या कल्याणासाठी 29 ऑगस्ट रोजी मुंबईला चला
खेड भोसे
आपल्या मुलांच्या कल्याणासाठी 29 ऑगस्ट रोजी मुंबई येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनासाठी सर्व मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी केले.
खेड भोसे खेड भोसे महात्मा गांधी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष त बंडू पवार यांची कन्या मयुरी आणि धनंजय नागटिळक यांचे सुपुत्र प्रज्वल यांचा विवाह सोमवारी पंढरपुरात पार पडला. या विवाह सोहळ्यासाठी श्री. जरांगे पाटील उपस्थित राहणार होते, मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र त्यांनी आपल्या सहकाऱ्यांमार्फत नववधूवरांना शुभेच्छा संदेश दिला.
त्यात त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मुंबई येथे पुन्हा आंदोलन करणार असल्याचा पुनरुच्चार करताना,
भावी पिढीच्या कल्याणासाठी 29 ऑगस्ट रोजी मुंबई येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले.
चौकट : नव दाम्पत्यांना भेटून आशीर्वाद देणार
सध्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे प्रत्यक्ष विवाहाला उपस्थित राहू शकत नसलो तरी भविष्यात तिकडे आल्यानंतर त्यांच्या घरी जाऊन त्यांना आशीर्वाद देणार असल्याची माहिती या संदेशाद्वारे श्री. पाटील यांनी दिली.
बातमी सोबत मनोज जरांगे पाटील यांचा फोटो वापरावा.