आमदाबाद विमान दुर्घटनेत सांगोल्यातील जोडप्याचा दुर्दैवी अंत एकूण अपघातामध्ये 265 लोकांचा मृत्यू
विमान अपघातात 11 नंबर सीटवर असलेला एक प्रवासी बचावला
आमदाबाद विमान दुर्घटनेत सांगोल्यातील जोडप्याचा दुर्दैवी अंत एकूण अपघातामध्ये 265 लोकांचा मृत्यू
MAYDAY… MAYDAY… विमान क्रॅश होण्यापूर्वी पायलटने दिला होता सिग्नल, काय आहे
|Updated on: Jun 12, 2025 |
अहमदाबाद येथील विमान क्रॅश होण्यापूर्वी वैमानिक सुमित सभरवाल यांनी मेडे असे म्हणत फोन केला होता. नेमका याचा अर्थ काय जाणून घ्या..
MAYDAY… MAYDAY… विमान क्रॅश होण्यापूर्वी पायलटने दिला होता सिग्नल, काय आहे अर्थ?
गुजरातच्या अहमदाबाद येथे एक मोठा विमान अपघात घडला आहे. अहमदाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनला जाण्यासाठी उड्डाण केलेल्या एअर इंडियाच्या बोइंग 787-8 ड्रीमलाइनर विमानाने टेकऑफ केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच अपघाताला बळी पडले. या विमानात 230 प्रवासी, 2 वैमानिक आणि 10 क्रू मेंबर्स असे एकूण 242 जण होते. विमान कोसळण्यापूर्वी वैमानिक सुमित सभरवाल यांनी मेडे (MAYDAY) कॉल केला होता. टेकऑफनंतर लगेचच त्यांनी हा आपत्कालीन कॉल करून एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) ला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, ATC कडून प्रत्युत्तर कॉल केला गेला तेव्हा वैमानिक तो घेऊ शकले नाहीत. त्यानंतर काही क्षणांतच विमान कोसळले.


