चिखलातून सिमेंटकडे विकासाच्या वाटचालीचा नवा अध्याय तर पेनूर गावाच्या रस्ते विकासात मोठी भर
चिखलातून सिमेंटकडे विकासाच्या वाटचालीचा नवा अध्याय तर पेनूर गावाच्या रस्ते विकासात मोठी भर
शिवसेना जिल्हाप्रमुख चरणराज चवरे यांच्या प्रयत्नातून पंढरपूर रोड ते तारापूर रस्त्याचे कॉंक्रिटीकरण काम पूर्ण
पेनूर (ता. मोहोळ) गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या शिवसेना जिल्हाप्रमुख चरणराज चवरे यांच्या प्रयत्नातून पेनूर गावातील मध्यवर्ती पंढरपूर रोड ते तारापूर रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणाचे भूमिपूजन नुकतेच मोठ्या उत्साहात पार पडले.
मात्र पावसाळ्यात वारंवार होणाऱ्या चिखलामुळे शेतकरी, विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत होता. ही अडचण लक्षात घेऊन, शिवसेना जिल्हा प्रमुख, जिल्हा नियोजन समिती सदस्य व ग्रामपंचायत सदस्य चरणराज चवरे यांच्या जिल्हा नियोजन समिती फंडातून या रस्त्याचे कॉंक्रिटीकरण करण्यात येत आहे.
या कार्याची सुरुवात ही केवळ रस्ता बांधणीपुरती मर्यादित नसून, ग्रामीण भागातील दैनंदिन अडचणी दूर करण्याच्या एक सकारात्मक पावलाची सुरूवात आहे. “शेतकरी व कष्टकरी वर्गाला गावात येताना पायाला चिखल लागला नाही पाहिजे” हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून श्री. चवरे यांनी हे पाऊल उचलले आहे.
या भूमिपूजन सोहळ्याला मुख्य अतिथी अमोलदादा चवरे,प्रवीण शेंबडे,बालाजी चवरे, अजित शेंबडे,आकाश माने,पै. बाळासाहेब चवरे, लखन पवार,अक्षय शिंदे,सुनील इंगळे, विनायक अनुसे व गणेश राऊत यांची उपस्थिती लाभली.
तसेच पेनूर ग्रामपंचायतीचे वर्तमान सरपंच सुजित आवारे यांनीही कार्यक्रमास हजेरी लावून रस्त्याच्या या कामाचे कौतुक केले.
तर गावाच्या प्रत्येक भागात भौतिक सुविधा पोहोचवण्यासाठी चरणराज चवरे हे सातत्याने प्रयत्नशील असून त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक विकासकामे यशस्वीपणे पार पडली आहेत. त्यांनी घेतलेली ही धडपड तळागाळातील जनतेसाठी एक प्रेरणास्थान ठरत आहे.
-०-
चौकट
जिल्हाप्रमुख चरणराज चवरे विकासाची निष्ठावान ताकद
शिवसेना जिल्हा प्रमुख, जिल्हा नियोजन समिती सदस्य व ग्रामपंचायत सदस्य म्हणून चरणराज चवरे हे पेनूर गावाच्या आणि परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी सतत प्रयत्नशील आहेत. ग्रामीण भागाच्या प्रगतीसाठी नेहमी पुढाकार घेणारे चवरे गावोगाव रस्ते विकास, पायाभूत सुविधा निर्माण यामध्ये आघाडीवर आहेत. शेतकरी आणि कष्टकरी वर्गाच्या अडचणी दूर करण्यासाठी ते कायम कटिबद्ध राहिले आहेत.भूकणाऱ्यांना बिस्कीट टाका आणि काम करत राहा” या त्याच्या विचारातून त्यांची कार्यशैली स्पष्ट होते. “कोणी रोखू शकत नाही उत्तर हे कामातूनच दिले जाईल!” ही त्यांची ठाम भूमिका आहे. त्यांच्या नेतृत्वात पेनुर गावाचा विकास अधिक वेगाने घडतो आहे आणि ही प्रेरणादायी वाटचाल भविष्यातही अविरत सुरू राहो, हीच अपेक्षा!
-०-