Sunday, October 12, 2025
Latest:
सोलापूर

आमदार अभिजीत पाटील यांनी केली पूर परिस्थिती पाहणी

Spread the love

आमदार अभिजीत पाटील यांनी केली पूर परिस्थिती पाहणी

तहसीलदार सचिन लंगोटे यांच्या समवेत आमदार पाटील यांनी नदीकाठच्या गावचा केला पाहणी दौरा

प्रतिनिधी/-

पिराची कुरोली, वाडीकुरोली, शेळवे, खेडभाळवणी, कौठळी,व्होळे, खेडभोसे, देवडे, पटवर्धन कुरोली, आव्हे, पेहे, सांगवी, बादलकोट, उंबरे, करोळे, कान्हापुरी या भागांमध्ये माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजीत आबा पाटील यांनी पूर परिस्थितीची पाहणी केली.

यावेळी पंढरपूरचे तहसीलदार सचिन लंगोटे हे उपस्थित होते. प्रत्येक गावातील नुकसानीचे पंचनामे तत्काळ करण्यात यावे अशा सूचना आमदार अभिजीत पाटील यांनी दिल्या. देवडे येथील पुराच्या पाण्यामुळे घर संसार उघड्यावर पडलेल्या नागरिकांना अत्यावश्यक वस्तूंचे किट देण्यात आलं..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *