पुलावरून वाहून गेलेले रिक्षाचालक सतिष शिंदे अद्याप बेपत्ता; खासदार प्रणिती शिंदे यांचे प्रशासनाला निर्देश – NDRF पथक दाखल, शोधमोहीम सुरू
🛑 पुलावरून वाहून गेलेले रिक्षाचालक सतिष शिंदे अद्याप बेपत्ता; खासदार प्रणिती शिंदे यांचे प्रशासनाला निर्देश – NDRF पथक दाखल, शोधमोहीम सुरू
दिनांक, १४ सप्टेंबर २०२५
सोलापूर शहरात मुसळधार पावसामुळे जुना पुना नाका स्मशानभूमी शेजारील पुलावरून वाहणाऱ्या नाल्यात काल मध्यरात्री साडेबारा ते एकच्या सुमारास सतीश सुनील शिंदे (वाहन क्र. एम एच – १३ सी टी ०६४१) हे वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे.
आज रोजी घटनास्थळी खासदार प्रणिती शिंदे, काँग्रेस शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांनी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यांच्या कुटुंबियांचीही भेट त्यांना धीर दिला. खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर महापालिका आयुक्त सचिन ओंबासे, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्याशी संपर्क साधून तातडीने शोधमोहीम राबविण्याची मागणी केली.
यावेळी बोलताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, सोलापूर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावर सुरू असलेल्या कामाजवळ बॅरिकेडिंग न केल्यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. रात्री रिक्षाचालक सतीष शिंदे हे पुलाजवळून जात असताना पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले असून अजूनही त्यांचा शोध लागलेला नाही. या घटनेबाबत प्रशासनाला तातडीने सूचना केल्या असून NDRF चे पथक घटनास्थळी दाखल होऊन शोधमोहीम सुरू आहे. देव करो सतीष शिंदे सुखरूप सापडावेत, अशी प्रार्थना मी करते,” असे खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या. त्यांनी पुढे सांगितले की, “राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळेच ही दुर्घटना घडली आहे. लोकांचे जीव गेल्याशिवाय यांचे डोळे उघडत नाहीत. जबाबदारी एकमेकांवर ढकलण्याचा प्रकार सुरू आहे, लोकांच्या जीवाशी खेळ केला जात आहे. म्हणूनच ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा,” अशी ठाम मागणी खासदार प्रणिती शिंदे यांनी केली.
praniti shinde
प्रणितीशिंदे
▬▬▬ஜ۩(tp)۩ஜ▬▬▬



