Thursday, January 15, 2026
Latest:
सोलापूर

खासदार प्रणिती ताई शिंदे यांची उत्तर सोलापूर तालुक्यातील शिवनी गावातील पूरग्रस्त नागरिकांशी भेट घेऊन विचारपूस केली.

Spread the love

🛑 खासदार प्रणिती ताई शिंदे यांची उत्तर सोलापूर तालुक्यातील शिवनी गावातील पूरग्रस्त नागरिकांशी भेट घेऊन विचारपूस केली.

खासदार प्रणिती शिंदे यांनी डॉक्टर भैय्यासाहेब वळसंगकर प्रशाला, तिऱ्हे येथे सीना नदीकाठच्या पुरामुळे स्थलांतरित झालेल्या शिवनी गावातील नागरिकांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली.

शिवनी गावातील नागरिकांनी खासदारांना दूरध्वनीद्वारे कळवले की, गावाला पुराने वेढा दिला असून सुमारे 15 ते 20 कुटुंबांना प्रशासनाने काल रात्रीच वळसंगकर प्रशालेत स्थलांतरित केले आहे. याशिवाय अनेक नागरिक बैल-गुरांसह हिरज हद्दीतील शिवारात अडकले असून त्यांची सोय करावी तसेच गावातून बाहेर पडण्यासाठी बोटीची सोय उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली.

या तक्रारीवर तत्काळ प्रतिसाद देत खासदार प्रणिती ताई शिंदे यांनी जिल्हाधिकारी साहेबांशी संपर्क साधून एनडीआरएफची टीम शिवनीला पाठवावी, अशा सूचना दिल्या. यावेळी त्या म्हणाल्या, लोकांनी घाबरून न जाता खंबीरपणे या नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा. मी सदैव तुमच्या पाठीशी उभी आहे.

यावेळी गावचे सरपंच गोवर्धन जगताप, तालुका अध्यक्ष भारत जाधव, माजी सरपंच नेताजी सुरवसे, जिल्हा समन्वयक मनोज यलगुलवार, ग्रामपंचायत सदस्य बबलू सुरवसे, स्वप्निल आगलावे, अक्रम पठाण, कुमार सुरवसे व ग्रामसेवक मॅडम उपस्थित होते.

तसेच खासदारांनी जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांशी बोलून स्थलांतरित झालेल्या सर्व नागरिकांची वैद्यकीय तपासणी करून गरज असल्यास औषधोपचार करावेत, अशा सूचनाही दिल्या. रात्रीच्या निवासासाठी चादरींची सोय करून देण्यात येईल, असेही त्यांनी आश्वासन दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *