श्री. दत्त दूध संकलन केंद्र हे शेतकऱ्यांच्या विश्वासाचे प्रतीक : शेखर पाटील
श्री. दत्त दूध संकलन केंद्र हे शेतकऱ्यांच्या विश्वासाचे प्रतीक : शेखर पाटील
खेड भोसे
दूध व्यवसाय आणि दुधाच्या स्पर्धेत टिकून राहणे हे वाटते तितके सोपे नाही. श्री. दत्त दूध संकलन केंद्राने तब्बल 14 वर्षे शेतकऱ्यांच्या विश्वासावर दूध क्षेत्रात आपला वेगळा ब्रँड तयार केला आहे, असे गौरवोद्गार कृषीराज शुगरचे संचालक शेखर पाटील यांनी काढले.
पंढरपूर तालुक्यातील खेडभोसे येथील श्री. दत्त दूध संकलन केंद्र आणि शीतकरण केंद्राचा 14 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी कृषीराज शुगरचे संचालक शेखर पाटील, सरपंच सुरेखा देवळे, उपसरपंच शुभांगी साळुंखे, पोलीस पाटील नंदिनी गवळी, ग्रामपंचायत सदस्य अशोक पवार, विकास पवार, सोसायटीचे चेअरमन बंडू पवार उपस्थित होते.
श्रायबर डायनॅमिक्स डेअरी आणि दीपगंगा मिल्क अँड ऍग्रो प्रॉडक्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते, या शिबिरात 56 रक्तदात्यांनी रक्तदान केले. यात महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
सुरुवातीला संस्थेचे चेअरमन सिद्धेश्वर पवार यांनी दूध संकलन केंद्राच्या 14 वर्षातील विविध टप्प्यांवरील प्रवासाचा लेखाजोखा उपस्थितांसमोर मांडला.
यावेळी बायफ, सोलापूर जिल्हा एरिया मॅनेजर डॉ. दिनेश पवार, अक्षय ब्लड बँकेचे डॉ. उदय पाटील, सागर जाधव, संतोष पवार, देवडेचे सरपंच झांबरे, हणमंत पवार, दिलीप पवार, सुरेश पवार, प्रशांत पवार, सत्यवान जाधव यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, दूध उत्पादक सभासद, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संतोष पवार, प्रवीण पवार, शनितेज पवार यांनी प्रयत्न केले.
चौकट : 1) यावेळी राज्य तसेच देश पातळीवर कुस्ती स्पर्धांमध्ये उल्लेखनीय मिळवलेल्या पैलवानांचा नागरी सत्कार करण्यात आला. यात किशोर पवार, गणेश पवार यांचाही सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
2) दूध संकलन केंद्राच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून संस्थेच्या वतीने दूध उत्पादक सभासदांना प्रत्येक वर्षी अनोखी भेटवस्तू देण्यात येते. यापूर्वी सभासदांना दुधाची किटली, पाटी, टब, साडी, बाजरी बी, मिनरल मिक्स्चर, पाण्याचे जार यांचे वाटप करण्यात आले आहे. या वर्षी टिकाऊ आणि दणकट पिशवी, कप सेट भेट देण्यात आला.
सोबत फोटो: खेडभोसे येथील श्री. दत्त दूध संकलन केंद्राच्या वर्धापन दिनी गावातील पैलवानांचा सत्कार करताना मान्यवर.
