Thursday, January 15, 2026
Latest:
सोलापूर

श्री शिवाजी विद्यालय कारी प्रशालेची शैक्षणिक सहल उत्साहात संपन्न

Spread the love

श्री शिवाजी विद्यालय कारी प्रशालेची शैक्षणिक सहल उत्साहात संपन्न
कारी: येथील श्री शिवाजी विद्यालय कारी प्रशालेतील विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील नैसर्गिक साधनसंपत्ती व ऐतिहासिक वास्तू व किल्ले यांची माहिती देण्यासाठी प्रशालेचे कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक तथा प्राचार्य महंमद शेख यांच्या नियोजनाने शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले होते. तीन दिवसीय शैक्षणिक सहलीत 50 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता
या शैक्षणिक सहली दरम्यान खालील ठिकाणास भेटी देण्यात आल्या वाई येथील गणपती दर्शनाने सहलीची सुरुवात झाली. नंतर थंड हवेची ठिकाणे असलेले पाचगणी,महाबळेश्वर या ठिकाणांचा अनुभव घेतला. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मितीची सुरुवात ज्या मावळ भागातून केली त्या मावळ भागात असलेल्या जावळी खोऱ्यातील प्रतापगडास विद्यार्थ्यांनी भेट देऊन त्या ठिकाणच्या जंगलांचा, डोंगरदर्‍यांचा, विविध ऐतिहासिक स्थळांचा परिचय करून घेतला. नंतर छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेला रायगड किल्ला या किल्ल्याची सुद्धा माहिती अनुभवली.
त्यानंतर विद्यार्थ्यांनी अजिंक्य राहिलेला सागरी मुरुड जंजिरा किल्ल्याच्याही बांधकामाचे कुतूहल केले. तसेच दिव्यागर या बीच वरती विद्यार्थ्यांनी स्पीड बोटिंग, उंटावर बसून फिरणे, रायडिंग, समुद्री माशांविषयी माहिती, महासागरास येणारी भरती-ओहोटी याचाही अनुभव घेतला. नंतर प्रति बालाजी या वास्तूची माहिती घेऊन, जेजुरीचा खंडोबा आणि मोरगाव येथील गणरायाच्या दर्शनाने आमच्या सहलीची सांगता करण्यात आली. प्रशालेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य महंमद शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन लोहार, अविनाश कांदे, नागेश वाघमारे, शुभांगी भड,स्वप्निल काळे यांनी नियोजन करून सहल यशस्वीरित्या पूर्ण केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *