मोहोळ येथील क्रांतिवीर भगतसिंग कराटे अकॅडमी चा चौथा वर्धापन दिन देशभक्त संभाजीराव गरड महाविद्यालय येथे उत्साहात साजरा करण्यात आला.
मोहोळ (प्रतिनिधी): मोहोळ येथील क्रांतिवीर भगतसिंग कराटे अकॅडमी चा चौथा वर्धापन दिन देशभक्त संभाजीराव गरड महाविद्यालय येथे उत्साहात साजरा करण्यात आला.
मोहोळचे ग्रामदैवत सद्गुरु नागनाथ महाराज देशभक्त संभाजीराव गरड महाविद्यालयाचे संस्थापक डॉक्टर वसंतराव गरड कराटे प्रशिक्षक, योगाचार्य सुरेश जाधव यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली, अकॅडमीचे खेळाडू जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्तरावर व खेलो इंडिया सारख्या नामांकित स्पर्धेपर्यंत पोहोचून त्या ठिकाणी यश संपादन करत आहेत. अकॅडमी आज चार वर्षाची यशस्वी कारकीर्द पूर्ण करून पाचव्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे, अकॅडमीच्या खेळाडूंनी वर्षभरामध्ये ज्या स्पर्धा जिंकलेल्या असतात, कराटे बेल्ट परीक्षेमध्ये प्राविण्य मिळवलेले असते अशा खेळाडूंना प्रमाणपत्राचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख चरणराज चवरे, मोहोळच्या नगराध्यक्ष सिद्धीताई वस्त्रे, ऍड. ऐश्वर्या बारसकर, माझी मुख्याध्यापक पांडुरंग सोलंकर, अकॅडमी चे पालक सचिन शास्त्री यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी धाराशिव सहकारी साखर कारखान्याचे संचालक रणजीत भोसले, जगदंबा विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक श्रीधर उन्हाळे, दाईंगडेवाडी वाडीचे पोलीस पाटील अमोल काळे, अकॅडमी चे पालक निर्मलाताई पांढरे, लक्ष्मण वाघमोडे, सुहास शिंदे, नितीन बारसकर, पत्रकार बांधव व अकॅडमीचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अकॅडमीचे संस्थापक दशरथ काळे यांनी केले. सूत्रसंचलन श्रावणी दळवे हिने तर संस्कृती गायकवाड हिने आभार व्यक्त केले.
क्रांतिवीर भगतसिंग कराटे अकॅडमीच्या माध्यमातून खेळाडूंचा सर्वांगीण विकास व्हावा, त्यांच्या ज्ञानामध्ये भर पडावी व व्यासपीठावरील धाडस वाढावे यासाठी उन्हाळी प्रशिक्षण शिबिर, महिला, मुलींच्या स्वसंरक्षणासाठी मोफत कराटे प्रशिक्षण वर्गाचे आयोजन केले जाते, या वर्गातून शेकडो मुलींना याचा लाभ मिळालेला आहे.
दशरथ काळे
अध्यक्ष क्रांतिवीर भगतसिंग कराटे अकॅडमी, मोहोळ.
