Sunday, March 1, 2026
Latest:
सोलापूर

प्रथम वर्ष इंजिनिअरिंग, बी.फार्मसी आणि एमबीए प्रवेशासाठीआवश्यक ‘सीईटी २०२६’ करिता ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ

Spread the love


प्रथम वर्ष इंजिनिअरिंग, बी.फार्मसी आणि एमबीए प्रवेशासाठी
आवश्यक ‘सीईटी २०२६’ करिता ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ
दि. २० फेब्रुवारी २०२६ पर्यंत चालणार ही प्रक्रिया
पंढरपूर– शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये प्रथम वर्ष इंजिनिअरिंग, बी.फार्मसी आणि एम.बी.ए.ला प्रवेश घेण्यासाठी आवश्यक असलेल्या व राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष (सीईटी सेल), मुंबई यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या ‘सीईटी २०२६’ या परीक्षेकरिता ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रक्रियेला आता आणखी सात दिवसाची मुदतवाढ दिली असून आता विद्यार्थ्यांना शुक्रवार, दि.१३ फेब्रुवारी २०२६ पासून ते शुक्रवार, दि.२० फेब्रुवारी २०२६ पर्यंत फॉर्म भरता येणार आहे.’ अशी माहिती स्वेरीचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांनी दिली.
पदवी अभियांत्रिकी, पदवी फार्मसी आणि पदव्युत्तर पदवी असलेल्या एम.बी.ए.च्या प्रवेशाकरीता अत्यंत महत्वपूर्ण समजल्या जाणार्‍या ‘एमएएच-सीईटी २०२६’ या परीक्षेसाठी फॉर्म भरण्याची मुदत शासनाने दि.१० जानेवारी २०२६ पासून ते गुरुवार, दि. १२ फेब्रुवारी २०२६ पर्यंत दिली होती. परंतु दिलेल्या कालावधीत विद्यार्थ्यांचे फॉर्म भरण्यासाठी काही कागदपत्रे अपुरी होती त्यामुळे त्यांना फॉर्म भरता आला नाही. अशा विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून शासनाने यासाठी आणखी सात दिवसांची मुदतवाढ दिली आहे. आता शुक्रवार, दि.१३ फेब्रुवारी २०२६ पासून ते शुक्रवार, दि. २० फेब्रुवारी २०२६ पर्यंत ही प्रक्रिया सुरु राहणार आहे. सदर फॉर्म भरण्याची मोफत सुविधा स्वेरी मध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. याचा इच्छुक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा. शासनाने यंदा नियमात बदल केले असून ‘सीईटी २०२६’ या परीक्षेत पहिल्या प्रयत्नात कमी पर्सेंटाईल मिळाले असतील तर त्यासाठी शासनाने विद्यार्थ्याचे नुकसान होऊ नये म्हणून तो विद्यार्थी आणखी एकदा परीक्षा देवू शकतो. या दोन्ही परीक्षेत ज्या परीक्षेत जास्त पर्सेंटाईल मिळाले असतील त्या परीक्षेच्या गुणपत्रिकेचा लाभ विद्यार्थ्याला प्रवेश प्रक्रियेवेळी घेता येईल म्हणजेच ही ‘सीईटी २०२६’ परीक्षा दोन वेळी देता येवू शकते. या दोन्ही परीक्षेसाठी शासनाकडून शुल्क देखील आकारले जाणार आहे. विद्यार्थ्यांनी सदर फॉर्म भरण्यासाठी येताना आपल्या प्रवर्गानुसार आवश्यक असणारी फी आणि आवश्यक ती कागदपत्रे सोबत आणावी. हे शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे. सीईटी फॉर्म भरण्यासाठी विद्यार्थ्यांना स्वतःचा अपार आयडी तयार करून ठेवावा लागेल, तसेच आधार कार्ड, आयडेंटी आकाराचा रंगीत फोटो, एटीएम कार्ड अथवा ऑनलाईन बँकिंगचा लॉगीन आयडी आणि त्याचा पासवर्ड, ओटीपी करिता मोबाईल या महत्वाच्या बाबी आवश्यक असणार आहेत. याबाबत शासनाच्या संकेतस्थळावर अधिक माहिती उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी प्रा.उत्तम अनुसे (मोबा.-९१६८६५५३६५), बी. फार्मसीसाठी प्रा. आर.एस. नाईकनवरे (मोबा.-८९९९९७३६२५) तर एम.बी.ए. संदर्भात प्रा. सागर सरीक (मोबा. नंबर– ९८९०४१९०४९) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *