राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री अजित दादा पवार यांच्या हस्ते श्री संतोष राजगुरू
याना महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलच्या प्रदेश सरचिटणीस पदी निवड झाल्याचे पत्र देण्यात आले यावेळी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष व खासदार श्री सुनील तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ओबीसी प्रदेश अध्यक्ष व सावता परिषद संस्थापक अध्यक्ष श्री कल्याण काका आखाडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश युवक अध्यक्ष श्री सुरज चव्हाण, माजी खासदार श्री आनंद परांजपे व पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि इतर मान्यवर उपस्थित होते, या वेळी दादांनी निवडीचे पत्र देऊन सत्कार करण्यात आला व शुभेच्छा दिल्या आणि राज्यात जोरदार ओबीसी संघटन करावे असे सांगून श्री संतोष राजगुरू यांच्या संघटन कौशल्याचा फायदा नक्कीच पक्षाला होईल असा विश्वास व्यक्त केला आहे

