Friday, November 28, 2025
Latest:
पुणे

शरद मोहोळ हिंदुत्ववादी, म्हणून त्याची हत्या’, भाजप आमदाराने सोलापुरात उधळली मुक्ताफळे

Spread the love

भाजपचे तेलंगणातील आमदार टी राजा यांनी केलेल्या वक्तव्याची चर्चा होत आहे. शरद मोहोळ हा माझा मित्र, तो गोरक्षण करणारा होता, हिंदुत्ववादी होता म्हणून त्याची हत्या करण्यात आली, असे ते म्हणाले आहेत. सोलापुरात हिंदु आक्रोश मोर्चाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याची शुक्रवारी त्याच्याच साथीदारांनी हत्या केली होती. तेलंगणाचे आमदार टी राजा सिंह यांनी शरद मोहोळचं उदात्तीकरण केल्याचे समोर येत आहे. ‘शरदभाऊची हत्या झाली, ते हिंदुत्ववादी होते, त्यांनी तुरूंगामध्ये जिहाद्याला मारले होते. त्यामुळे शरद मोहोळ यांच्यासाठी प्रार्थना करा’ अशा शब्दात आमदार टी राजा यांनी शरद मोहोळची भलामण केली. सोलापुरमध्ये आयोजित केलेल्या हिंदु जन आक्रोश मोर्चात ते बोलत होते. एक कुख्यात गुंड अनेक लोकांचा जीव घेतो, अनेकांना धमकावून खंडण्या गोळा करतो, अशा शरद मोहोळबाबत टी. राजा यांनी केलेल्या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यावेळी भाजपचे आमदार नितेश राणेदेखील उपस्थित होते. शरद मोहोळ हा माझा मित्र, तो गोरक्षण करणारा होता, हिंदुत्ववादी होता म्हणून त्याची हत्या करण्यात आली, असं वक्तव्य भाजपचे तेलंगणातील आमदार टी राजा यांनीसोलापुरात केलं. शरद मोहोळला परत पाठवा अशी देवाकडे प्रार्थना करा असं आवाहनही राजा यांनी केलं. सोलापुरात हिंदू जन आक्रोश मोर्चाच्या कार्यक्रमा दरम्यान आज काही दुकानांवर दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली. यात एक व्यक्ती किरकोळ जखमी झाली आहे. तर या प्रकरणी पोलीसांत गुन्हा नोंदवण्यात आला असून एका व्यक्तीला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. या कार्यक्रमाला नितेश राणे, टी. राजा सिंग हे उपस्थित होते. तसेच कार्यक्रमातील भाषणादरम्यान कोणी वादग्रस्त विधान केले का? याचा पोलीस तपास करणार आहे. सकल हिंदू समाजाच्या वतीने शनिवारी दुपारी आपल्या विविध मागण्याकरिता काढण्यात आलेल्या जन आक्रोश मोर्चात किरकोळ दगडफेकीची घटना घडलीय. ही घटना आणि हुल्लडबाजीमुळं टिळक चौक ते कौतम चौक परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं, काही समाजकंटक तरुणांनी दगडफेक केली तर काही ठिकाणी सोडाच्या बाटल्या फेकण्याची दिसून आले, परंतु पोलीस प्रशासनाच्या तगडा बंदोबस्त अन् समयसूचकता परिस्थिती निवळण्यास महत्त्वपूर्ण ठरलीय. शनिवारी सायंकाळच्या सुमारास तेलंगणाचे आमदार राजा सिंह ठाकूर यांच्यासह आमदार नितेश राणे, मोर्चा समन्वयक सुधीर भैरवाडेसह हिंदू जन आक्रोश मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून कन्ना चौकाकडे मार्गस्थ झाला. मोर्चात सहभागी झालेले युवक ‘जय श्रीराम’ च्या घोषणा देत होते, तसेच पाकिस्तानच्या विरोधातील घोषणा देत होते. सायंकाळी साडेसहा-पावणे सातच्या सुमारास हा मोर्चा मार्गावरील टिळक चौक येथे आला. त्यावेळी तरुणांनी हुल्लडबाजी केली. याठिकाणी आल्यानंतर मोठमोठ्याने घोषणा दिल्या जात होत्या. मधला मारुती ते कौतम चौक दरम्यान रस्त्यावर दोन्ही बाजूला मोठ्या संख्येने एका समुदायाची दुकाने आहेत. त्यामुळे तरुणांना अधिकच जोश आला. यातच काही जणांनी दुकानावर दगड फेकून तर काहींनी सोडाच्या बाटल्या फेकल्या गेल्याचे सांगण्यात आले, पण नेमके हे दगड आणि सोडाच्या बाटल्या कुठून आले हे मात्र समजू शकले नाही. पुढील अनर्थ घडू नये, म्हणून व्यापाऱ्यांनी आपली दुकाने पटापट बंद केली. मोर्चातला बराचसा भाग हा कन्ना चौकापर्यंत पोहोचलेला असताना शेवटच्या टोकाला असलेल्या काही युवकांनी हा गोंधळ केल्याचे प्रत्यक्ष दर्शीनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *