श्रद्धा संकुल येथे विज्ञान दिन व मार्केट डे उत्साहात संपन्न
श्रद्धा संकुल येथे विज्ञान दिन व मार्केट डे उत्साहात संपन्न
श्रद्धा संकुल येथे थोर शास्त्रज्ञ सी व्ही रमन यांची जयंती विज्ञान दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली. यामध्ये श्रद्धा इंग्लिश मीडियम स्कूल च्या विद्यार्थ्यांनी 28 डॉक्टरांची वेगवेगळी भूमिका साकारलेली होती. या कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी मोहोळ तालुक्यातील नामवंत डॉ.अच्युत नरूटे, डॉ. प्रीतीनंद गवळी, डॉ.अतुल गायकवाड, डॉ. मनोज देवकते, डॉ.प्रदीप पाटकर, डॉ विश्वजीत विभुते, संस्थेचे सचिव श्री सुनील झाडे, मिलन ढेपे मोहित झाडे हे उपस्थित होते.
विज्ञान दिनानिमित्त आयोजित डॉक्टरांची भूमिका साकारलेल्या विद्यार्थ्यांशी सर्व मान्यवरांनी मनमोकळेपणाने संवाद साधला. तसेच मार्केट डे (भाजी मंडई) निमित्त सर्व उपस्थित विद्यार्थ्यांचे मान्यवरांनी कौतुक केले. पालेभाज्या, वेगवेगळे स्नॅक्स, ड्रायफूड, मठ्ठा, पाणीपुरी, लस्सी, पॅटीस, शेवग्याच्या शेंगा, यासारखे अनेक खाद्यपदार्थ विद्यार्थ्यांनी विक्रीस आणलेले होते. याला पालकांनी प्रचंड असा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला मार्केट डे च्या निमित्ताने विद्यार्थ्यांना व्यवहारिक ज्ञानाची ओळख झाली. मार्केट डे च्या निमित्ताने मार्केट मध्ये खूप मोठी उलाढाल झाली. विद्यार्थ्यांनी पालकांना आपल्या कौशल्यातून गणित ,भाषिक कौशल्य, संवाद, यासारखे कौशल्य विकसित केलेले जाणवून दिले, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेतील विद्यार्थिनी लावण्या शास्त्री हिने केले. प्रास्ताविक सहसक्षिका मुस्कान आतार यांनी केले तर हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी शाळा व्यवस्थापिका धरती पाटील दोन्ही प्रशालेचे मुख्याध्यापक दिनेश नरळे व विना कदम, सलमान मुल्ला, विद्या माने, पल्लवी गोडसे विद्या पवार, तृप्ती कदम व तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे योगदान लाभले.

