माजी सैनिकांचा सन्मान करणे आपले कर्तव्य- तुकाराम बाबा★ संखमधील सैनिक महामेळाव्यास प्रतिसाद
माजी सैनिकांचा सन्मान करणे आपले कर्तव्य- तुकाराम बाबा
★ संखमधील सैनिक महामेळाव्यास प्रतिसाद
फोटो
संख- माजी सैनिकांचा महामेळाव्यात बोलताना हभप तुकाराम बाबा महाराज. यावेळी सांगली जिल्हा कल्याण सैनिक अधिकारी लेप्ट कर्नल भिमसेन चवदार, सुनील पवार, संदीप शिंदे, बापूसाहेब कोडग, निवृत्ती माने, चंद्रकांत फाटक, अध्यक्ष बबनराव कोळी आदी.
जत/प्रतिनिधी:- सिमेवर देशसेवा करणे सोपे काम नाही. आपल्या भारतवासियांच्या सेवेसाठी, रक्षणासाठी घरादारापासून दूर राहून, आपल्या जिवाची बाजी लावून सैनिक काम करत असतात. २० ते ३५ वर्षे देशसेवा करून गावी आलेल्या या माजी सैनिकांचा, त्यांच्या कुटूंबियांचा सन्मान करणे हे आपले कर्तव्य आहे. सिमेवर ते देशाचे रक्षण करत होते म्हणून आज आपण येथे सण, उत्सव व आपला प्रपंच करत आहोत हे विसरून चालणार नाही. माजी सैनिकांचा सन्मान करा असे आवाहन चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज यांनी केले.
जत तालुक्यातील संख येथील बाबा आश्रमात माजी सैनिक वेलफेअर असोशिएशन, जत तालुका आजी, माजी, सैनिक कल्याण संघटनेतर्फे गुरुवारी माजी सैनिकांचा महामेळावा संपन्न झाला. आजी, माजी सैनिकांचे प्रश्न यावर महामेळाव्यात चर्चा झाली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून तुकाराम बाबा बोलत होते.महामेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सांगली जिल्हा कल्याण सैनिक अधिकारी लेप्ट कर्नल भिमसेन चवदार होते. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सुनील पवार, उमदी पोलीस ठाण्याचे सहाययक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे, बापूसाहेब कोडग, निवृत्ती माने, जिल्हा सहाय्यक अधिकारी चंद्रकांत फाटक यांची प्रमुख उपस्थिती होती.
तुकाराम बाबा यांनी यावर्षीपासून दरवर्षी माजी सैनिकांचा मेळावा श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेच्या वतीने घेण्यात येईल त्यास सर्वांनी सहकुटूंब उपस्थित रहावे असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष सांगली जिल्हा कल्याण सैनिक अधिकारी लेप्ट कर्नल भिमसेन चवदार व जिल्हा सहाय्यक अधिकारी चंद्रकांत फाटक यांनी माजी सैनिकांना मार्गदर्शन करण्याबरोबरच त्यांच्याशी संवाद साधला, त्यांच्या अडचणी जाणून घेत शंकेचे निरसन केले. उमदी पोलीस ठाण्याचे सहाययक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनीही माजी सैनिक हा आमचा आत्मा असून त्यांना सर्वतोपरी सहकार्य करू अशी ग्वाही दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आजी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष बबनराव कोळी यांनी केले तर सुत्रसंचलन अब्बास सैय्यद यांनी केले. शेवटी उपाअध्यक्ष सिध्दु गायकवाड यांनी आभार मानले. यावेळी संघटनेचे महेशकुमार जगताप, बाळासाहेब भोसले, विजय कुरणे, दत्तात्रय शिंदे, सतीश शिंदे, आकाराम बिसले, भाऊसाहेब पाटील, दत्ता शिंदे, दिपक खांडेकर, आर. ए. स्वामी, नामदेव कटरे, उमाजी मारनूर, बाबासाहेब पांढरे, आगतराव जाधव, शहाजी शिंदे, रामचंद्र साळुंखे, डिकसळ, संजय चौगुले, शिवाजी साळुंखे, सूर्यकांत यादव, दिलीप जाधव, बाबासाहेब शिंदे , नानासाहेब कुटे, धानाप्पा बिराजदार, आकाराम गायकवाड, चनापा आवटी आदी उपस्थित होते.






