एकच ध्यास पिनवर गावचा विकास आष्टी टप्पा क्रमांक 2 ची योजना लागणार लवकरच लागणार मार्गी-चरणराज चवरे
आष्टी टप्पा क्रमांक 2 ची योजना लागणार लवकरच लागणार मार्गी-चरणराज चवरे
→मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आदेश
सोलापूर प्रतिनिधी
आष्टी टप्पा क्रमांक 2 पोखरापूर,सारोळे,खवणी,चिखली,पेनूर या गावांची लवकरच थांबलेली कामे मार्गी लागण्यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख चरणराज चवरे यांनी सर्व शेतकरी व गावचे सरपंच यांना घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी गेले असता त्यांना निवेदन दिले.त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रखडलेली कामे लवकर मार्गी लावण्याचे आदेश दिले असल्याची माहिती सोलापूर शिवसेना जिल्हाप्रमुख चरणराज चवरे यांनी दिली.
त्यावेळी पोखरापूरचे उपसरपंच शिवसेना तालुका उपप्रमुख आशिष आगलावे, सारोळचे सरपंच शाहीर सलगर, खवणीचे सरपंच महादेव यमगर शिवसेना शाखाप्रमुख रघुनाथ झांबरे ,तंटामुक्तीचे अध्यक्ष अनिल कदम,शंकर पाथरूट तानाजी लादे, सुहास आवारे ,कोमल महाराज कणसे,आदी शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.
-०-
चौकट,
मी शिवसेनेचा तालुका प्रमुख असताना शिवतारे बापू हे त्यावेळी जलसंपदा मंत्री होते.त्यांच्या माध्यमातून पाठपुरावा करून आष्टी टप्पा क्रमांक दोन ही योजना मंजूर केली होती.आज ते काम अंतिम टप्यात असून काही अडचणीमुळे रखडलेली कामे लवकर चालू होतील.महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांना त्या ठिकाणच्या सर्व अडचणी आम्ही सर्वांनी त्यांना सांगितल्या लवकरच त्यावर तोडगा काढू असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी सांगितले व तसे आदेशही खाली दिले आहेत. लवकरात लवकर कामे चालू करून शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम करू असे आश्वासनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी दिले आहे.
—-शिवसेना जिल्हाप्रमुख नियोजन समिती सदस्य चरणराज चवरे

