Thursday, January 15, 2026
Latest:
सोलापूर

हजारो भाविकांच्या उपस्थितीत चिक्कलगी भुयार येथे तुकाराम बीज साजरी

Spread the love

हजारो भाविकांच्या उपस्थितीत चिक्कलगी भुयार येथे तुकाराम बीज साजरी
★ जत, मंगळवेढयांचा दुष्काळ हटू दे: पांडुरंगाला तुकाराम बाबांचे साकडे

जत/प्रतिनिधी:- महाराष्ट्रासह कर्नाटकातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तपोवन रेवणसिद्ध चिक्कलगी भुयार येथे प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी तुकाराम बीज व वैकुंठ गमन सोहळ्या चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटबेचे सर्वेसर्वा हभप तुकाराम बाबा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
तूकाराम बीज व वैकुंठ गमन सोहळ्यानिमित्य आयोजित धार्मिक सोहळयाला भाविकांनी अलोट गर्दी केली होती. मंगळवारी दुपारी बारा वाजता हभप तुकाराम बाबा महाराज यांच्या किर्तनानंतर फुले टाकण्याचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

सोहळ्यास सोलापूर लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार आ. प्रणिती शिंदे, भैरवनाथ शुगर लवंगीचे चेअरमन अनिल सावंत, मंगळवेढा मार्केट कमिटीचे संचालक सोमनाथ आवताडे, जगन्नाथ रेल्वे विठ्ठल साखर कारखान्याचे संचालक सचिन वाघाटे , मंगळवेढयाचे माजी सभापती प्रदीप खांडेकर, अँड. नंदकुमार पावार, भगीरथ भालके, शिवसेनेचे वेताळ भगत, पंढरपूर येथील अमर पाटील, आनंद पाटील, दिगंबर यादव, अमोल म्हमाणे, मारुती वाकडे, नागेश बिराजदार, पांडुरंग माळी, रेवणसिद्ध बिराजदार, बसवंत बिराजदार , मनोज माळी, माजी पंचायत समिती सदस्य नितीन पाटील, सलगर बुद्रुकचे माजी सरपंच बंडू जाधव, चिक्कलगी भुयारचे माजी सरपंच दिनेश पाटील, उपसरपंच नवनाथ मेटकरी,[
गुरूसाहेब बिराजदार, लक्ष्मण निकम, देवकर गुरुजी, पुंडलिक साठे महाराज, प्रसिद्ध वास्तुविशारद तज्ञ सरिता लिंगायत, संजय धुमाळ, भारत क्षीरसागर आदी उपस्थित होते.
तुकाराम बीजचे मुख्य किर्तन हभप तुकाराम बाबा महाराज यांचे झाले. कोरोनाचा काळ आठवा, माणुसकी जपा, एकमेकांना सहकार्य करा असे आवाहन करून हभप तुकाराम बाबा महाराज म्हणाले, कायम दुष्काळाचा कलंक माथी घेवून फिरणाऱ्या जत व मंगळवेढा तालुक्याचा दुष्काळा हटणार आहे तरी कधी. पाणी योजना मंजूर होवून त्याला तातडीने निधी उपलब्ध होणे गरजेचे आहे. जतला पाणी आणण्यासाठी संख ते मुंबई मंत्रालय पायीदिंडीसह पाणी परिषदा व आंदोलने केली, त्याला आज यश मिळाल्याचे समाधान आहे. येणाऱ्या काळात जत व मंगळवेढा तालुक्यातील बांधापर्यत पाणी येईपर्यत जलचळवळ सुरूच राहणार असल्याचे बाबांनी यावेळी स्पष्ट केले.जत, मंगळवेढयांचा दुष्काळ हटू दे असे साकडे यावेळी तुकाराम बाबा यांनी पांडुरंगाला घातले.
यावेळी आ. प्रणिती शिंदे, भगीरथ भालके यांनीही आपले मनोगत व्यक्त करताना तुकाराम बाबा यांच्या कार्याचे कौतुक करत बाबांना सर्वतोपरी सहकार्य करू अशी ग्वाही दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *