आ.प्रणितीताई यांना डॉ.धवलसिंह मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वाखाली १७ गावातून मताधिक्य देणार:संग्राम जाधव
आ.प्रणितीताई यांना डॉ.धवलसिंह मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वाखाली १७ गावातून मताधिक्य देणार:
संग्राम जाधव
सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेस पक्षाच्या उमेदवार आ.प्रणितीताई शिंदे यांना मोहोळ विधानसभेला जोडलेल्या पंढरपूर तालुक्यातील फुलचिंचोली, तारापूर, आंबे, चळे, मगरवाडी, खरसोळी, पोहोरगांव, पुळुजवाडी, आंबेचिंचोली, विटे, शंकरराव, पुळुज, सरकोली कोंढारकी, रांझणी, ओझेवाडी, नळी या १७ गावातून सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी ग्राहक संरक्षण विभागाच्या वतीने सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष डॉ.धवलसिंह मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वाखाली मताधिक्य देणार अशी ग्वाही सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी ग्राहक संरक्षण विभागाचे जिल्हाध्यक्ष संग्राम जाधव यांनी दिली.
सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी ग्राहक संरक्षण विभाग जिल्हाध्यक्ष संग्राम जाधव यांनी १७ गावातून ग्राहक संरक्षण विभागाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांचेमार्फत प्रचार यंत्रणा राबविण्यास सुरुवात केली आहे.
सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय उमेदवार आ. प्रणितीताई शिंदे यांचा लवकरच १७ गावामध्ये दौरा होणार असून दौऱ्यात त्या १७ गावांना भेटी देऊन ग्रामस्थांच्या अडी-अडचणी जाणून घेणार आहेत. सध्या विद्यमान खासदार जय सिद्धेश्वर महास्वामी कसलेही फिरकले नसल्याने लोकांमध्ये भाजप सरकारच्या विरोधात असंतोष असून काँग्रेसचे उमेदवार आ. प्रणितीताई शिंदे यांना जनतेमधून पाठिंबा व लोकप्रियता मिळत आहे.
आमदार प्रणितीताई शिंदे यांचे कार्य वाकण्याजोगे आहे, त्यांनी ‘सोलापूर शहर मध्य’ या विधानसभा मतदारसंघात सर्वसामान्य गोरगरीब जनतेची कामे केली असून, त्यांची युवा वर्गात क्रेझ आहे. त्यामुळे आमदार प्रणितीताई शिंदे सोलापूर लोकसभा मतदारसंघातून चांगल्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी ग्राहक संरक्षण विभाग जिल्हाध्यक्ष संग्राम जाधव यांनी दिला.


