Thursday, January 15, 2026
Latest:
सोलापूर

आमदार अभिजीत पाटील यांच्या प्रयत्नातून सीना-माढा उपसा सिंचन योजनेसाठी उजनी धरणातून पाण्याचे आवर्तन सुरू

Spread the love

आमदार अभिजीत पाटील यांच्या प्रयत्नातून सीना-माढा उपसा सिंचन योजनेसाठी उजनी धरणातून पाण्याचे आवर्तन सुरू

प्रतिनिधी/-

माढा तालुक्यातील सर्व पाझर तलाव भरून घेण्यासाठी सीना-माढा उपसा सिंचन योजनेतून आमदार अभिजीत आबा पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून आज सकाळी पाण्याचे पूजन करून सोडण्यात आले. आमदार पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे शक्य झाले असून या निर्णयामुळे माढा तालुक्यातील शेतीला मोठा दिलासा मिळणार असून आगामी हंगामात कृषी उत्पादनात मोठी वाढ होण्याची अपेक्षा आहे.

माढा तालुक्यातील सर्व पाझर तलाव भरण्यासाठी सतत अधिकाऱ्यांसोबत बैठक व चर्चा करून आज पाणी सोडण्यात आले असून शेतकऱ्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे. टेल टू हेड पाणीपुरवठा पुर्ण होईल. असे आमदार अभिजीत पाटील यांनी सांगितले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य भारतआबा शिंदे, जेष्ठ नेते, भारतनाना पाटील, युवक जिल्हाध्यक्ष सुरज देशमुख, युवती जिल्हाध्यक्ष विनंती कुलकर्णी, डिव्हीपी बँकेचे चेअरमन औदुंबर महाडिक, रामकृष्ण काळे, सुरेश पाटील, बाळासाहेब ढेकणे, हरिभाऊ माने, आकाश पाटील, दिपक खोचरे, धाराशिव साखर कारखान्याचे संचालक संदीप खारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

चौकट
गेले कित्येक वर्ष या योजनेसाठी शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून रणजीत शिंदे यांनी पैसे घेतले ८१टक्के हे शासनाने व १९टक्के हे शेतकऱ्यांनी भरायचे असताना देखील शेतकऱ्यांकडून पूर्णपणे पैसे वसुली करण्यात आली त्या पैशाचा हिशोब रणजित शिंदे यांनी द्यावा तसेच काल परवा ज्यांनी आमदारांवर टीका केली त्यांची कुवत त्यांनी स्वतः तपासून घ्यावी या शब्दात जिल्हा परिषद सदस्य भारत शिंदे यांनी खोचक टीका केली. – जि.प.सदस्य, भारत शिंदे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *