Sunday, March 1, 2026
Latest:
सोलापूर

मुलं घडवने शिक्षकांसोबत पालकांचीही जबाबदारी : प्रा.विशाल गरड

Spread the love

मुलं घडवने शिक्षकांसोबत पालकांचीही जबाबदारी : प्रा.विशाल गरड

मुलं घडवत असताना शिक्षकांसोबत पालकांचीही समान जबाबदारी असते असे प्रतिपादन प्रसिद्ध लोकव्याख्यानकार प्रा.विशाल गरड यांनी केले. ते यशश्री अकॅडमीने आयोजित केलेल्या व्याख्यानाप्रसंगी “विद्यार्थी जीवनातील दशा आणि दिशा” या विषयावर बोलत होते. सुमारे दीड तासाच्या व्याख्यानात विद्यार्थी जीवनात मोबाईलचे दुष्परिणाम, अभ्यासाबाबत नैराश्य, सध्याची विद्यार्थी जीवनशैली अशा विविध विषयांना त्यांनी अग्रस्थानी घेतले. याप्रसंगी भाळवणीचे सरपंच रणजीत जाधव, उपसरपंच नितीन शिंदे, जैनवाडी चे माजी सरपंच दीपक पवार, उद्योजक सिताराम माने, विद्यार्थी तसेच पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक अकॅडमीचे संस्थापक प्रवीण लिंगडे सर यांनी केले. आभार रणजीत लोखंडे सर यांनी मांडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *