महाराष्ट्र राज़्य ऊस उत्पादक संघाकडून राज्यस्तरीय ऊस कार्यगौरव पुरस्कार सोहळा पार पडला….
महाराष्ट्र राज़्य ऊस उत्पादक संघाकडून राज्यस्तरीय ऊस कार्यगौरव पुरस्कार सोहळा पार पडला….
गेली बारा वर्ष महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघाकडून शेतकऱ्यांना ऊस शेती बद्दल मार्गदर्शन करणे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यासाठी मदत करणे तसेच शेतकऱ्यांच्या अडीअडचणी शासन दरबारी मांडणे एकरी 100 टन उत्पादन निघालेल्या शेतकऱ्यांचे पुरस्कार देऊन सत्कार करणे तसेच जे शेतकऱ्यांसाठी उत्पन्न वाढवण्यासाठी ज्यांचे हातभार असतात त्यांची या संघाकडून निवड करून त्यांना पुरस्कार दिले… आज महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघाकडून राज्यस्तरीय कार्य गौरव पुरस्कार वितरण करण्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष किसान संघ परिसंघ शेतकरी संघटना मा श्री रघुनाथ दादा पाटील , महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघाचे संस्थापक अध्यक्ष श्री अतुल नाना माने पाटील तसेच पाडेगाव ऊस संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ श्री डॉ.सुरेश उबाळे सर, केळी उत्पादक शेतकरी महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष किरण भाऊ चव्हाण तसेच जिल्हा कृषी अधीक्षक सांगली माननीय श्री विवेक कुंभार ई मान्यवरांच्या हस्ते आज अलवेरान ऑरगॅनिकचे पदाधिकारी श्री मेघनाथ देशमुख ( पेनुर,) श्री नितीन वसेकर ( पाटकुल ) यांना आज ऊस विकास कार्य गौरव हा राज्यस्तरीय पुरस्कार पेठ वडगाव सांगली येथे प्रदान करण्यात आले. यावेळी अलवेरोन ऑरगॅनिक चे सर्वेसर्वा माननीय श्री एमडी बागवान सर, श्री अनुराग पाटील सर, केके सर, तानाजी वसेकर सर, किरण लेंगरे, वैभव सुर्वे, सत्यवान घाडगे, कमलाकर गोफणे,दिलीप गावडे, विशाल पिसाळ, विनोद रावळ, मनोज पाटील, समीर दलवाई इत्यादी अधिकारी उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील शेतकरी सुद्धा उपस्थित होते. यावेळी रघुनाथ दादा पाटील यांनी शेतकऱ्यांना खूप चांगले मार्गदर्शन सुद्धा केले, तसेच महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघाचे संस्थापक अध्यक्ष श्री अतुल नाना माने पाटील यांनी सुद्धा सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त केले….
