पंढरपूर नगरपालिकेसाठी वार्ड क्रमांक11मधून अमोल पवार मैदानात उतरणार
पंढरपूर नगरपालिकेसाठी वार्ड क्रमांक11मधून अमोल पवार मैदानात उतरणार
अखिल भारतीय मराठा महासंघ पंढरपूर शहर अध्यक्ष, वेगळे सामाजिक उपक्रम राबविले,आपल्या विभागात वृक्षारोपण करणे,वेगवेगळी शिबिरे आयोजित करणे फोफत आरोग्य तपासणी, मोफत नेत्र तपासणी व मोफत नेत्र शस्त्रक्रिया करणे, तसेच मराठा महासंघाच्या माध्यमातून लोकांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करणे,कचेरी असो, नगरपालिका असो, पोलीस स्टेशन असो, पंचायत समिती असो,शाळा,कॉलेज असो अशा वेगवेगळ्या ठिकाणी लोकांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करणे.आपल्या भागातील रस्ते, लाईट, पाणी यासह विविध समस्यांवर संबंधित विभागात निवेदन देऊन आदरणीय प्रशांत मालक परिचारक असतील, समाधान दादा आवताडे असतील,उमेशमालक असतील, अर्जुनराव चव्हाण असतील, प्रणवदादा परिचारक असतील यांच्या माध्यमातून लोकांची कामे,आपल्या भागातील समस्या पाठपुरावा करून सोडवीने, भागातील मंडळाच्या माध्यमातून वेगवेगळे उत्सव साजरा करणे, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्यांचा सन्मान करणे त्यांना प्रोत्साहन देणे यासह विविध राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात सहभाग घेणे.वेगवेगळ्या सामाजिक आंदोलनात सहभागी होणे.
