अखिल भारतीय मराठा महासंघ पंढरपूर यांच्या वतीने पंढरपूर नगरपरिषदेस निवेदन विसावा मंदिर इसबावी परिसरातील पाणी पुरवठा टाकीच्या पाईप मधून हजारो लिटर पाणी वाया जात आहे
अखिल भारतीय मराठा महासंघ पंढरपूर यांच्या वतीने पंढरपूर नगरपरिषदेस निवेदन विसावा मंदिर इसबावी परिसरातील पाणी पुरवठा टाकीच्या पाईप मधून हजारो लिटर पाणी वाया जात आहे ते नगरपालिका प्रशासनाने लक्ष घालून लवकरात लवकर पाईप दुरुस्ती करून होनारी पाणी गळती थांबवावी अन्यथा मराठा महासंघाच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल या आशयाचे निवेदन उपमुख्याधिकारी सुनील वाळूजकर साहेब यांना देण्यात आले. एका बाजूला पाणी टंचाईमुळे दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे आणि दुसरीकडे मात्र टाकीच्या पाईप मधून मोठ्या प्रमाणात पाणी गळती चालू आहे तरी प्रशासन याची दखल घेत नाही.पंढरपूर हे तिर्थक्षेत्र असल्यामुळे रोज हजारो भाविक येत असतात व आषाढी एकादशी ही जवळ आल्यामुळे प्रशासनाने त्वरित लक्ष घालून मोठ्या प्रमाणात वाया जाणारे पाणी थांबवावे.यावेळी निवेदन देताना मराठा महासंघाचे पंढरपूर शहराध्यक्ष अमोल पवार,शहर संघटक काका यादव, रिक्षा संघटना अध्यक्ष नागेश गायकवाड, सदस्य अमर सुरवसे यांच्या सह मराठा महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.


