पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आणि उच्च शिक्षण यावरती काम करण्याची गरज आहे,
पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आणि उच्च शिक्षण यावरती काम करण्याची गरज आहे, याबाबत चांगले शिक्षण व उद्योग आणून या भागाचा सर्वांगीण विकास करण्याचा माझा मानस आहे, असा संकल्प राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे अधिकृत उमेदवार अनिल सावंत यांनी संपर्क दौरा व पदयात्रा या निमित्ताने धर्मगाव, ढवळस,मल्लेवाडी, देगाव,घरनिंकी मारापुर व गुंजेगाव या गावातील प्रचारादरम्यान वक्तव्य केले.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपर्क दौरा व पदयात्रा यादरम्यान गावांना भेट देत असताना ग्रामस्थांनी अनिल सावंत यांचे उत्साहात जोरदार स्वागत केले.
येत्या निवडणुकीत शेतकऱ्यांच्या आणि जनसामान्यांच्या मूलभूत सुविधांसाठी व त्यांच्या हक्काच्या संरक्षणासाठी मला आपला आमदार म्हणून आपली सेवा करण्याची संधी द्यावी असे आवाहन त्यांनी केले.
यादरम्यान कर्नाटक राज्याचे प्रदेशाध्यक्ष सी एस इनामदार साहेब, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल शहा, किसन गवळी,मुजफ्फर काझी, संतोष गंधवे,चंद्रशेखर कोंडूभैरी, माणिक गुंगे सर व वृषालीताई इंगळे पाटील हे मान्यवर उपस्थित होते. अनिल दादा सावंत यांच्या विकासाच्या धोरणावरती विश्वास ठेवून विलास बनसोडे, बालाजी ढेकळे, संतोष डोईफोडे, हनुमंत बनसोडे,कांतीलाल दुधाळ, मल्हारी ढेकळे, सचिन चौगुले, राजाराम डोईफोडे,काशिलिंग बनसोडे, गंगाराम गोरे, संजय बनसोडे,दत्ता डोईफोडे,केराप्पा ढेकळे, भागवत ढेकळे व दत्ता गोरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट यामध्ये आपला पक्षप्रवेश केला .
एकंदरीतच अनिल सावंत यांना या मंगळवेढा व पंढरपूर भागातून मिळणारा प्रतिसाद उल्लेखनीय आहे.
येत्या निवडणुकीत आपला पाठिंबा देऊन ‘तुतारी वाजवणाऱ्या माणूस’ या चिन्हासमोरील बटन दाबून विजयी करा असे आवाहन अनिल सावंत यांनी ग्रामस्थांना केले.