आज भैरवनाथ शुगर वर्क्स लिमिटेड, युनिट क्र. ३, लवंगी, मंगळवेढा येथे १२ वा गळीत हंगाम २०२५-२०२६ चा बाॅयलर अग्निप्रदीपन सोहळा अत्यंत उत्साहात व पारंपरिक पद्धतीने संपन्न झाला.
भैरवनाथ शुगर वर्क्स लिमिटेड, युनिट क्र. ३, लवंगी, मंगळवेढा येथे १२ वा गळीत हंगाम २०२५-२०२६ चा बाॅयलर अग्निप्रदीपन सोहळा अत्यंत उत्साहात व पारंपरिक पद्धतीने संपन्न झाला.
उद्योगाच्या प्रगतीचा आणि शेतकरी बांधवांच्या श्रमसन्मानाचा नवा अध्याय आज या शुभारंभावेळी सुरू झाला आहे. ऊस उत्पादक शेतकरी, सभासद, कामगार आणि सर्व सहकारी यांच्या एकत्र प्रयत्नातून भैरवनाथ शुगर उद्योग समूहाने गेल्या काही वर्षांत जो विश्वास मिळवला आहे, तोच विश्वास या हंगामात अधिक दृढ करण्याचा आमचा संकल्प आहे.
या निमित्ताने सर्व शेतकरी बांधव, कर्मचारीवृंद व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. उद्योगाच्या माध्यमातून ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती, आर्थिक स्थैर्य आणि सर्वांगीण विकास साधण्यासाठी आम्ही तत्पर आहोत.
आपल्या सर्वांच्या सहकार्याने आणि आशीर्वादाने हा गळीत हंगाम समृद्ध, सुरक्षित आणि यशस्वी होवो हीच अपेक्षा!
भैरवनाथशुगर #गळीतहंगाम२०२५२६ #ऊसउत्पादकशेतकरी #मंगळवेढा #लवंगी #BhairavnathSugar #ग्रामीणविकास



