मोहोळ तालुक्यातील औंढी शाळेतील उपक्रमशील शिक्षक तथा शेजबाभुळगावचे सुपुत्र हणमंत सिद्राम बनसोडे यांना रोटरी क्लब ऑफ पंढरपूर च्या वतीने राष्ट्र निर्माता अवॉर्ड नुकताच जाहीर झाला आहे.
*अंकोली, दि.५(दशरथ रणदिवे): मोहोळ तालुक्यातील औंढी शाळेतील उपक्रमशील शिक्षक तथा शेजबाभुळगावचे सुपुत्र हणमंत सिद्राम बनसोडे यांना रोटरी क्लब ऑफ पंढरपूर च्या वतीने राष्ट्र निर्माता अवॉर्ड नुकताच जाहीर झाला आहे. शैक्षणिक,सामाजिक,राष्ट्रीय क्षेत्रातली उल्लेखनीय कार्याबद्दल दिला जाणारा हा अवॉर्ड पंढरपूर येथे अध्यक्ष डाॅ. वैभव सादिगले यांनी जाहीर केला आहे. शिक्षक दिनी सिंहगड इन्स्टिटय़ूट कोर्टी (पंढरपूर) येथे दुपारी ३ वा. पीडीजी डाॅ मोहन देशपांडे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. संशोधन पेपर सादरीकरण ,शैक्षणिक सहलीतून पर्यटन व इतिहास भूगोल ओळख,मतदार नोंदणी उत्कृष्ट कामकाज, दहावी, बारावी बोर्ड परिक्षा उत्कृष्ट कामकाज, केंद्रप्रमुख पदावर उत्कृष्ट कामकाज, स्पर्धा परीक्षा, व्यक्तिमत्वविकास स्पर्धा, शालेय शैक्षणिक उपक्रम निर्मिती ,शैक्षणिक साहित्य निर्मिती, अभिलेख बांधणी केली. यावेळी डाॅ. कैलास करांडे , प्राचार्य सिंहगड इन्स्टिटय़ूट कोर्टी, सचिव डाॅ मयुर परिचारक , अध्यक्ष डाॅ. वैभव सादिगले यांची उपस्थिति आहे. ग्रामस्थ,शिक्षक, विद्यार्थी, पालकांची उपस्थिती राहणार आहे.




