सावित्रीबाई फुले यांच्या विचारांतून पुढील पिढी घडवली पाहिजे – संगीता फाटे
सावित्रीबाई फुले यांच्या विचारांतून पुढील पिढी घडवली पाहिजे – संगीता फाटे
अंकोली, दि.०५(दशरथ रणदिवे ):
सावित्रीबाई फुले यांच्या विचार, कार्य आणि त्यागातून प्रेरणा घेऊन पुढील पिढी घडवली पाहिजे, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले महिला पतसंस्थेच्या संचालिका व माजी चेअरपर्सन संगीता नंदकुमार फाटे यांनी केले. त्या सावित्रीबाई फुले महिला पतसंस्थेच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती व संस्थेच्या ३५व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या. या कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने करण्यात आली. तसेच संस्थेचे संस्थापक शाहीर विश्वासराव फाटे यांना अभिवादन करण्यात आले.
यानंतर उपस्थित मान्यवरांनी सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक, सामाजिक कार्यावर प्रकाश टाकत आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमास संस्थेच्या चेअरपर्सन अॅड. प्रांजलीताई सागर फाटे, व्हॉ. चेअरपर्सन रेखा सूर्यकांत कांबळे, संचालिका कीर्ती शिवराज शिंदे, अॅड. शमशाद मकबुल मुलाणी, डॉ. भारती मनोज देवकते, स्मिता मनोज महाजन, यशोदा दिलीप कांबळे, संध्या आकाश फाटे, वैशाली अशोक भोसले, स्मिता प्रकाश कोकणे, वैशाली अनंत माने, कल्याणी चंदन बरे यांच्यासह संस्थेच्या कर्मचारी अनुराधा अशोक भालेकर, मनीषा नागनाथ हेळकर, प्रवीण ब्रह्मदेव शिंदे, गौरव सुरेश झुंजार, वैशाली चंद्रकांत चव्हाण आदी उपस्थित होते.
जयंतीनिमित्त समाजोपयोगी उपक्रम म्हणून मोहोळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर एक च्या विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. तसेच संस्थेचे व्यवस्थापक सिकंदर मुजावर यांनी सावित्रीबाई फुले यांची ‘नवस’ ही कविता सादर करून कार्यक्रमात भावनिक रंग भरला. तसेच मोहोळ नगरपरिषद निवडणुकीमध्ये वार्ड क्रमांक सात मधून निवडून आलेल्या संस्थेच्या माजी संचालिका भारती भारत बरे यांचा माहेरची भेट साडी चोळी देऊन सन्मान करण्यात आला.
या वेळी मोहोळ अर्बन बँकेचे व्यवस्थापक सुदर्शन शिंदे, कर्मचारी खेलूदेव वाघमोडे, भैरवनाथ जाधव, आकाश शिंदे ,अमीन आतार, शहाबाज शेख, रोहन कोठावळे, महेश कारंडे आदी उपस्थित होते. हा कार्यक्रम उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात पार पडला.
