मराठा युवकांनी शेतीबरोबर उद्योजकाकडे वळावे – मा.आ. दत्तात्रय सावंत
मराठा युवकांनी शेतीबरोबर उद्योजकाकडे वळावे – मा.आ. दत्तात्रय सावंत
पंढरपूर(प्रतिनिधी):- मराठा समाजातील युवकांनी नोकरीच्या मागे न लागता बदलत्या जीवनशैलीला अंगीकृत करून फक्त शेतीवर अवलंबून न राहता शेतीला जोडधंदा म्हणून उद्योजकाकडे वळावे असे प्रतिपादन माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनी केले.
कर्ज योजना व मार्गदर्शक मेळाव्या प्रसंगी माजी आमदार सावंत बोलत होते यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की दिवसेंदिवस परंपरागत शेती बरोबरच युवकांनी लघु उद्योगाच्या माध्यमातून उद्योजक बनावे त्याचबरोबर महिलांनीही महिलांचे लहान मोठे उद्योग करून उद्योगपती बनाव्यात. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून युवकांना कर्ज मिळत आहे. आत्तापर्यंत अनेकांनी याचा लाभ घेतला असला तरीही शिक्षण झाल्यानंतर युवकांना पारंपारिक शेती करताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते यासाठी आता तरुणांनी लघु उद्योगाच्या माध्यमातून उद्योजक बनून मराठा समाजाबरोबरच इतर समाजाच्या युवकांनाही नोकरी देण्याचे ध्येय समोर ठेवावे. कर्ज घेताना काही अडीअडचणी येत असेल तर आपल्या युवक अध्यक्षांना मराठा समाजाचे जिल्हाध्यक्ष अर्जुनराव चव्हाण आहेत. याचबरोबर महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांना याबाबत विचारणा करून कर्ज मंजूर करून घेऊन उद्योजक बनण्यासाठी प्रयत्नशील राहावे असे सांगितले.
यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष अर्जुनराव चव्हाण म्हणाले की अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून कर्ज घेताना कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीला अथवा एजंटशी संपर्क न ठेवता संबंधित बँक मॅनेजरशी संपर्क साधावा, काही अडचणी आल्यास अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क करावा परंतु बळी न पडता आपले कर्ज मंजूर करून घ्यावे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला कडे कर्ज घेताना ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही सुविधा आहेत याचा लाभ घ्यावा व आपल्या पायावर उभे राहून इतरांच्या हाताला काम द्यावे ही जिद्द मनात बाळगून प्रत्येकाने लघुउद्योजक बनावे. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आत्तापर्यंत समाजाचे एक लाख बांधवांनी कर्ज घेऊन उद्योग उभारले आहेत अजूनही उभा करण्याचे मानस आहे असे सांगितले.
मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांच्या मार्गदर्शनातून पुढचे पाऊल या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
सदर कार्यक्रम प्रसंगी बँकेचे अधिकारी शिवाजी दरेकर, विनोद जगदाळे,मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अर्जुनराव चव्हाण,
शिवश्री शिवाजी मोरे, जिल्हा सचिव विलासराव देठे सर, उपाध्यक्ष सचिन गंगथडे, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष हनुमंत कदम, लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायतचे सरपंच, माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामस्थ, मराठा महासंघाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
