मोहोळ तालुक्यातील सौंदणे येथे भाजपाच्या वतीने मुब्रा चे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा निषेध व्यक्त
मोहोळ तालुक्यातील सौंदणे येथे भाजपाच्या वतीने मुब्रा चे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा निषेध व्यक्त ***
महाड येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो काल टराटरा फाडून आंबेडकर यांच्या अनुयायी च्या भावना भडकावणेच काम करणारे जितेंद्र आव्हाड यांना तात्काळ अटक करून त्यांचेवर योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्य महाराष्ट्र भाजपा श्री शंकरराव वाघमारे यांनी केली आहे.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे मुंब्राचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काल स्टंटबाजी करत जे समाज बांधवाच्या भावना भडकवण्याचे काम करत चुकीचे वर्तन केले त्याचा निषेध आंदोलन आज सकाळी नऊ वाजता सौंदणे येथे करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते .
यावेळी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष श्री शंकरराव वाघमारे, सौंदणे जि प शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तुकाराम भानवसे, माळी महासंघ चे चंद्रकांत वाघमारे, अविनाश मोकाशी, मारुती भानवसे, तानाजी सुतकर, भाजयुमो चे जिल्हा उपाध्यक्ष सागर दादा वाघमारे, चंद्रकांत चौधरी, ज्ञानेश्र्वर भानवसे , सयाजी राऊत, विठ्ठल वाघमारे, निवृत्ती राऊत , नागनाथ भानवसे, आनंदा भानवसे , दिलीप सुतकर, राजेंद्र भानवसे, अमोल नामदे , माऊली भानवसे, संतोष नामदे, विनायक भानवसे, बाळासो भानवसे , सुभाष भानवसे, नामदेव आदलींगे, दत्ता राऊत, यांच्या सह अनेक जन उपस्थित होते .
यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुळे वाहून नमन करणेत आले व जितेंद्र आव्हाड यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या .
