Thursday, November 27, 2025
Latest:
सोलापूर

नागनाथ भाऊ क्षीरसागर यांनी व त्यांच्या पूर्ण परिवाराने कायमच धनगर समाजाच्या रूढी परंपरा चालीरीती पाळलेल्या आहेत.

Spread the love

मोहोळ /

नागनाथ भाऊ क्षीरसागर यांनी व त्यांच्या पूर्ण परिवाराने कायमच धनगर समाजाच्या रूढी परंपरा चालीरीती पाळलेल्या आहेत. धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न असो ,अथवा समाजाचा कोणताही प्रश्न असो क्षीरसागर कुटुंबाने नेहमीच धनगर समाजाच्या प्रश्नासाठी पुढाकार घेतलेला आहे. सुशील क्षीरसागर हा युवक तर नावाप्रमाणेच ‘ सुशील ‘ आहे. मोहोळ नगरपरिषद निवडणुकीत लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पार्टीने शितल सुशील क्षीरसागर यांना अधिकृत उमेदवारी दिली आहे. त्यांना मोहोळकरांनी विजयी केल्यास मोहोळ शहराचा चेहरा मोहरा नक्कीच बदलेल असा माझा ठाम विश्वास आहे. असे सांगत केवळ निवडणुका आल्यानंतरच क्षीरसागरांना जातीबद्दल ट्रोल केले जाते हे चुकीचं आहे .असे परखड मत मोहोळ तालुक्याचे धनगर समाजाचे मार्गदर्शक अण्णासाहेब देशमुख यांनी केले.
मोहोळ नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शीतल सुशील क्षीरसागर यांनी मोहोळ तालुका धनगर समाजाचे मार्गदर्शक आण्णासाहेब देशमुख यांच्या ‘ देशमुख गडी ‘ येथे जाऊन भेट घेऊन आशीर्वाद घेतले. त्या प्रसंगी आण्णासाहेब देशमुख बोलत होते.ते पुढे म्हणाले की, माजी आमदार राजन पाटील यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्यामुळे त्यांची संपूर्ण ताकद ही शितल क्षीरसागर यांच्या पाठीशी उभी राहिली आहे.राजन पाटील यांचा एकही कार्यकर्ता क्षीरसागर कुटुंबातील शितल क्षीरसागर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिल्यामुळे नाराज नाही. त्यामुळे मोहोळ शहरात भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक व नगराध्यक्ष विजयी होतील यात मला कसलीही शंका नाही. तर विजयी गुलाल भाजपाचा च असेल असा माझा ठाम विश्वास आहे. नगर परिषदेच्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य, बांधकाम, स्वच्छता या सर्व यंत्रणांवर योग्य तो वचक ठेवून जनहिताची कामे करण्याची पात्रता सुशील क्षीरसागर यांच्या पत्नी शीतल क्षीरसागर यांच्यामध्ये आहे. असेही अण्णासाहेब देशमुख यावेळी म्हणाले. या प्रसंगी लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शीतल क्षीरसागर, शंकर वाघमारे,ओंकार देशमुख ,सुशील क्षीरसागर, कुंदन धोत्रे, संजय पडवळकर,प्रशांत होनमाने,गणेश होनमाने,एजाज तलफदार,कल्पना खंदारे आदी उपस्थित होते.

चौकट ………

‘  उठसुठ राजन पाटलांवरच टीका का ? आमच्यावर करा ना ..! ‘

विरोधकांना सांगण्यासारखे एक ही काम नाही.उठसुठ फक्त राजन पाटील,राजन पाटील याच नावाचा जप केला जातोय,त्यांच्यावरच टीका केली जातेय,ही निवडणूक नगरपरिषदेची आहे.टीका करायची च आहे तर माझ्यावर, शहाजहान शेख,नंदकुमार फाटे, नागनाथ सोनवणे अश्या मोहोळ मधील लोकांवर करा,केवळ आम्ही त्यांच्या विचाराने नगरपरिषदेत काम करतो अथवा करणार आहोत या कल्पनेनेमुळे गावच्या निवडणुकीत ही माजी आमदार राजन पाटलांवर टीका करणे योग्य नाही.टीका करायची तर आमच्यावर करा.
— आण्णासाहेब देशमुख , मोहोळ तालुका धनगर समाज मार्गदर्शक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *