Sunday, October 12, 2025
Latest:
सोलापूर

आईच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटकेतील आरोपीस जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथून जामीन मंजूर*

Spread the love

आईच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटकेतील आरोपीस जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथून जामीन मंजूर*

याची थोडक्यात हकीकत अशी की, मोहोळ पोलीस स्टेशन अंतर्गत दिनांक ०२/११/२०२३ रोजी भा.द.वी कलम ३०७,३२३, ५०४ अन्वये दंडनीय गुन्हयासाठी गुन्हा क्रमांक – ०७९४/२०२३ च्या अनुसार आरोपी बबलु उर्फ प्रदीप अण्णासाहेब शिंदे याचे विरुद्ध फिर्यादी म्हणजेच आरोपीच्या आईने गुन्हा दाखल केला होता. वरील प्रकरणात हकीकत अशी की, दिनांक ३१/१०/२०२३ रोजी यातील आरोपी याने स्वतःच्या आईला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने शेतातील विहिरी जवळ बोलावून शिवीगाळ करून हाताने व लाथा-बुक्क्याने छातीस मारहाण करून ” तुला आज जिवंत ठेवत नाही” असे म्हणून जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने विहिरीत ढकलून दिले होते आणि यातील फिर्यादी ही सकाळी ७:३० ते सायंकाळी ४ पर्यंत शेतातील विहिरीत मदतीसाठी वाट पाहत होती. आरोपीने घरातील शेतीच्या कारणावरून व शेतातील उत्पन्नाचे पैशासाठी नेहमी आई व परिवारा सोबत भांडण करत असत. फिर्यादीस उपचाराकरिता सोलापूर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यातील आरोपी हा दिनांक ०२/११/२०२३ पासुन अटकेत होता. आरोपीचा जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथे दाखल केला होता. मे. जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर यांनी आरोपीचा जामीन अर्ज मंजूर केला आहे. यात आरोपीतर्फे ॲड. कदीर औटी,ॲड. इमरान पाटील,ॲड. मनोज गावडे,ॲड. दत्तात्रय कापुरे व ॲड. सोहेल रामपूरे यांनी काम पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *