स्व. अभिजीत दादा क्षीरसागर कुस्ती संकुलन संचलित सिद्धनागेश कुस्ती तालीम मधील पै. रोहन पवार यांनी आपल्या उत्कृष्ट कुस्ती कौशल्याच्या जोरावर महाराष्ट्र चॅम्पियन आणि सिद्धेश्वर केसरी, लातूर हा मानाचा किताब पटकावला आहे.
स्व. अभिजीत दादा क्षीरसागर कुस्ती संकुलन संचलित सिद्धनागेश कुस्ती तालीम मधील पै. रोहन पवार यांनी आपल्या उत्कृष्ट कुस्ती कौशल्याच्या जोरावर महाराष्ट्र चॅम्पियन आणि सिद्धेश्वर केसरी, लातूर हा मानाचा किताब पटकावला आहे. त्यांच्या या उज्ज्वल यशाबद्दल कुस्ती संकुलनाच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला.
यावेळी आमचे चिरंजीव कु. आरव (दादा) सुशील क्षीरसागर तसेच अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत पैलवान रोहन पवार यांचा शाल, फेटा आणि पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला व त्यांचे सर्व वस्ताद यांचा सन्मान करण्यात आला.
स्व. अभिजीत (दादा) क्षीरसागर कुस्ती संकुलन हे मा. नागनाथ (भाऊ) क्षीरसागर यांच्या प्रेरणेतून सुरु झाले असून या संकुलातील मल्लांनी अनेक ठिकाणी आपल्या कुस्ती कौशल्याचा ठसा उमटवला आहे. विशेषतः पैलवान सिकंदर शेख यांनी महाराष्ट्र केसरी किताब जिंकून केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरात आपली ओळख निर्माण केली आहे.
पैलवान रोहन पवार यांचे मनःपूर्वक अभिनंदन! आपण अशीच मेहनत, जिद्द आणि चिकाटी कायम ठेवा आणि भविष्यात आणखी मोठी यशाची शिखरे गाठा ही सदिच्छा!!
याप्रसंगी सिद्धनागेश तालीमचे वस्ताद पै. चंद्रकांत काळे, पै. अशोक धोत्रे सर, संकुलनाचे धडाडीचे कार्यकर्ते मा. सागर लेंगरे, मा. रामहरी मोहिते गुरुजी, पै. रशीद शेख, पै. गणेश वाघमोडे, पै. संजय वाघमोडे, मा. गोफने फोटोग्राफर, मा. नंदकुमार काकडे त्याचसोबत कुस्तीप्रेमी व कुस्ती संकुलनात सराव करणारे सर्व पैलवान उपस्थित होते.
Sushil Kshirsagar