Thursday, January 15, 2026
Latest:
शेती विषयी

राजीव गांधी माध्यमिक विद्यालय फुलचिंचोली :- प्रशाले मध्ये ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती व बालिका दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

Spread the love

राजीव गांधी माध्यमिक विद्यालय फुलचिंचोली :- प्रशाले मध्ये ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती व बालिका दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. दादासाहेब प्रक्षाळे (उपसरपंच ग्रामपंचायत फुलचिंचोली ) प्रमुख पाहुणे श्री. बाळासाहेब पाटील (तंटामुक्ती अध्यक्ष फुल चिंचोली) प्रमुख उपस्थितीत श्री. मारुती (दादा) शंकर वाघ (माजी सरपंच ग्रामपंचायत फुल चिंचोली) श्री. दत्तात्रेय ब्रह्मदेव जाधव (चेअरमन) श्री. अभिजीत गायकवाड (सदस्य ग्रामपंचायत फुल चिंचोली )श्री. चंद्रकांत काळे (ग्रामपंचायत सदस्य फुलचिंचोली )श्री .नामदेव काळे (सदस्य ग्रामपंचायत फुल चिंचोली) श्री .राजाराम नामदे (माजी ग्रामपंचायत सदस्य फुलचिंचोली )श्री .ज्ञानेश्वर माळी (पालक )श्री .दिगंबर गायकवाड (पालक )श्री. सिद्धू प्रक्षाळे( अध्यक्ष शालेय शिक्षण व्यवस्थापन समिती जिल्हा परिषद केंद्र शाळा फुलचिंचोली )श्री .लक्ष्मण राऊत (पालक) प्रशालेचे संचालक श्री. वीरसेन (बापू )देशमुख श्री .सचिन देशमुख मुख्याध्यापक श्री. नागटिळक सर त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी सौ.स्वातीताई सचिन यादव ,सौ.पल्लवीताई रमेश वाघ, सौ .भाग्यश्रीताई समाधान गायकवाड ,सौ. शालन ताई लक्ष्मण राऊत ,वैष्णवी ताई मारुती गोरे उपस्थित होत्या. उपस्थित सर्व महिला ,अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते फोटो पूजनानंतर सोलापूर भारत स्काऊट गाईड यांच्यावतीने चारे,तालुका बार्शी या ठिकाणी झालेल्या मेळाव्यामध्ये सोलापूर जिल्ह्यात बिना भांड्याचा स्वयंपाक या स्पर्धेत राजीव गांधी माध्यमिक विद्यालय फुल चिंचोली या प्रशालेस प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल प्रमाणपत्राचे व ट्रॉफी चे वाटप उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सामाजिक वनीकरणातर्फे घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांनाही प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले .विद्यार्थ्यांच्या भाषणानंतर प्रमुख पाहुण्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचे शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. प्रशालेचे अध्यक्ष श्री.सुधीर सुभाषराव लोंढे -पाटील( वकील साहेब) यांनी कैलासवासी सिताराम डोंगरे यांच्या तिन्ही मुलांना शिक्षणासाठी दत्तक घेतले आहे. दहावीपर्यंत सर्व शिक्षणाची जबाबदारी अध्यक्षांनी स्वीकारली आहे. त्याबद्दल त्यांचेही कौतुक प्रमुख पाहुणे ,ग्रामस्थांनी यांनी केले. अध्यक्षीय भाषणाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री .तोरकडे सर यांनी केले, आभार प्रदर्शन मुख्याध्यापक श्री.नागटिळक सर यांनी केले .श्री. सुनील पाटील सर यांच्यातर्फे मुलांना खाऊ वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी ,विद्यार्थी व पालक उपस्थित होते .वंदे मातरम गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *