भारतीय रहिवासी असलेली गद्दार ज्योती मल्होत्रा पाकिस्तानची आयएसआय एजंट
Jyoti Malhotra : हेरगिरीचा आरोप असलेल्या युट्यूबर ज्योती मल्होत्रावर पहिला सर्जिकल स्ट्राईक; कारवाईची कुऱ्हाड कोसळली
Jyoti Malhotra : हेरगिरीचा आरोप असलेल्या युट्यूबर ज्योती मल्होत्रावर पहिला सर्जिकल स्ट्राईक; कारवाईची कुऱ्हाड कोसळली
तपासात असे दिसून आले की ती 2023 मध्ये कमिशन एजंट्सद्वारे व्हिसा मिळवल्यानंतर पाकिस्तानला गेली होती. तिथे तिची भेट पाकिस्तानी उच्चायोगाचे अधिकारी एहसान-उर-रहीम उर्फ दानिशशी झाली.
हेरगिरीचा आरोप असलेल्या युट्यूबर ज्योती मल्होत्रावर पहिला सर्जिकल स्ट्राईक कारवाईची कुऱ्हाड कोसळली
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारी हरियाणाची युट्यूबर ज्योती मल्होत्राच्या मुसक्या आवळण्यात आल्या असून ती पाच दिवसांच्या पोलिस कोठडीत आहे. आता ज्योतीला पहिला दणका देण्यात आला असून इन्स्टाग्राम अकाउंट बंद करण्यात आलं आहे. ज्योतीच्या अकाउंटला भेट दिल्यास ‘माफ करा हे पेज उपलब्ध नाही’ असे लिहिलं आहे. सुरक्षा यंत्रणांना संशय आहे की ज्योतीने तिच्या व्हिडिओंद्वारे पाकिस्तानसोबत अनेक महत्त्वाची माहिती शेअर केली आहे, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात आणखी अनेक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचा सहभाग असल्याचा संशय आहे. सध्या पोलिस तपासात गुंतले आहेत.
ज्योतीचे इंस्टाग्रामवर 1.31 लाख फॉलोअर्स आहेत
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, ज्योतीच्या ‘ट्रॅव्हल विथ जो’ या यूट्यूब चॅनलचे 3.77 लाख सबस्क्राइबर आहेत आणि तिचे इन्स्टाग्रामवर 1.31 लाख फॉलोअर्स आहेत. तपासात असे दिसून आले की ती 2023 मध्ये कमिशन एजंट्सद्वारे व्हिसा मिळवल्यानंतर पाकिस्तानला गेली होती. तिथे तिची भेट पाकिस्तानी उच्चायोगाचे अधिकारी एहसान-उर-रहीम उर्फ दानिशशी झाली, ज्याला अलीकडेच भारतातून हाकलून लावण्यात आले आहे.
तिचा खर्च तिच्या उत्पन्नापेक्षा जास्त
ज्योतीचे ‘ट्रॅव्हल विथ जो’ हे इन्स्टाग्राम अकाउंट उघडल्यावर, अकाउंट सस्पेन्ड केलेले दिसते. ज्योती मल्होत्राच्या अटकेनंतर, तिची बराच काळ चौकशी केली जात आहे. ज्योती मल्होत्रा परदेशात प्रवास करत असे आणि आलिशान हॉटेल्समध्ये राहत असे, जे प्रायोजित होते. तपास यंत्रणांनी तपासलेल्या नोंदींवरून असे दिसून आले आहे की तिचा खर्च तिच्या उत्पन्नापेक्षा जास्त होता.
हिसारच्या पोलिस अधीक्षकांनी कोणती माहिती दिली?
ज्योती मल्होत्राने तीन वेळा पाकिस्तानला भेट दिली आहे. तिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर यासंबंधी अनेक व्हिडिओ शेअर केले आहेत. ती सुमारे 12 दिवसांपासून पाकिस्तानात होती. पहलगाम हल्ल्यानंतर ती लाईव्ह आली आणि हसताना दिसली. या प्रकरणात, हिसारचे पोलिस अधीक्षक (एसपी) शशांक कुमार सावन यांनी माध्यमांना सांगितले की, आधुनिक युद्ध आता सीमांपुरते मर्यादित राहिलेले नाही. पाकिस्तानी गुप्तचर एजंट सोशल मीडियावर प्रभावशाली लोकांना भरती करून त्यांचा प्रचार करण्याचा प्रयत्न करत आहेत. केंद्रीय एजन्सींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, ज्योतीला हिसारच्या न्यू अग्रसेन कॉलनीतून अटक करण्यात आली. ज्योतीने अनेक वेळा पाकिस्तान आणि एकदा चीनला प्रवास केला होता. ती पाकिस्तानी गुप्तचर एजंटांच्या संपर्कात होती.
युट्यूबर ज्योती मल्होत्राचे चीनशी काय संबंध आहे?
हरियाणाची रहिवासी युट्यूबर ज्योती मल्होत्राला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. हिसार पोलिसांनी सांगितले की, पाकिस्तानी गुप्तचर संस्था (पीआयओ) तिला भारताविरुद्ध तयार करत होत्या, जेणेकरून तिचा योग्य वेळी वापर करता येईल. पोलिसांनी असेही म्हटले आहे की ज्योतीने तीन वेळा पाकिस्तानला भेट दिली होती, ज्यामध्ये पहलगाम हल्ल्यापूर्वीचाही समावेश होता. या काळात तिने चीनलाही भेट दिली होती. पत्रकार परिषदेत एसपी शशांक कुमार सावन म्हणाले, “केंद्रीय तपास संस्थांनी हरियाणा पोलिसांना सांगितले आहे की पीआयओ सॉफ्ट नॅरेटिव्ह्जचा प्रचार करण्यासाठी सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या लोकांना भरती करत आहे.” शुक्रवारी (16 मे 2025) अटक करण्यात आलेल्या ज्योतीला पाच दिवसांच्या पोलिस कोठडीत पाठवण्यात आले आहे
