Monday, March 2, 2026
Latest:
सोलापूर

खेडभोसे – आव्हे रोडवरील खड्डा देतोय अपघाताला आमंत्रण

Spread the love

खेडभोसे – आव्हे रोडवरील खड्डा देतोय अपघाताला आमंत्रण

बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

खेड भोसे

खेडभोसे ते आव्हे (एमडीआर 166) या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य झाले असून खेडभोसे गावाजवळील ओढ्यावरील पुलाजवळ मोठा खड्डा पडला आहे. रात्रीच्या वेळी हा खड्डा दिसत नसल्याने या ठिकाणी अनेक अपघात झाले आहेत.

परतीच्या पावसाने पंढरपूर तालुक्यातील सर्वच रस्त्यांची मोठी दुरावस्था झाली आहे. क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक करणारी वाहने तसेच सध्या साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू असल्याने ओव्हरलोड ऊस वाहतुकीमुळेही या रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. या रस्त्यांवरील डांबर उचकटून गेल्यामुळे लहान खडी रस्त्यावर पसरलेली आहे. या खडीवरून मोटरसायकली घसरून वारंवार अपघात होत आहेत.

खेडभोसे गावाजवळील ओढ्यावरील पुलाजवळच रस्त्याच्या मधोमध मोठा खड्डा पडला आहे. दिवसातून किमान ऊस वाहतूक करणारे 40 ट्रॅक्टर या रस्त्यावरून जातात. ऊसाच्या ट्रॅक्टरचे दोन्ही ट्रेलर जोडलेले असल्यामुळे आणि क्षमतेपेक्षा जास्त भरल्यामुळे याठिकाणी खड्ड्यात चाके फिरून दिवसेंदिवस हा खड्डा मोठा होत आहे.

हा खड्डा रात्रीच्या वेळेस नवीन वाहनचालकांना दिसत नसल्यामुळे या ठिकाणी अनेक अपघात झालेले आहेत.

बांधकाम विभागाने हा खड्डा तसेच इतर मोठे खड्डेही वेळीच न भरून घेतल्यास या ठिकाणी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बांधकाम विभागाने अपघाताची वाट न पाहता या संपूर्ण रस्त्याची नव्याने करावा अशी मागणी वाहनचालकांमधून होत आहे.

चौकट : करकंब उपविभाग अंतर्गत येणाऱ्या सर्वच रस्त्यांची मी पाहणी केलेली आहे, या रस्त्यांची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. मात्र सध्या आचारसंहिता असल्यामुळे दुरुस्ती करण्यासाठी टेंडर काढतात येत नाही. आचारसंहिता उठताच एएमसी अंतर्गत सर्वच रस्त्यांची कामे हाती घेण्यात येणार आहेत.
मात्र खेडभोसे गावाजवळील धोकादायक खड्डा 1 – 2 दिवसात भरून घेण्यात येईल.

  • अक्षय बागम, सहाय्यक अभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग, करकंब

सोबत फोटो: खेडभोसे गावाजवळ रस्त्याच्या मधोमध पडलेला हाच तो धोकादायक खड्डा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *