कोरोनाचा काळ आठवा, वृक्षारोपन मोहीम हाती घ्या- हभप तुकाराम बाबा महाराज
कोरोनाचा काळ आठवा, वृक्षारोपन मोहीम हाती घ्या- हभप तुकाराम बाबा महाराज
फोटो
जत- संखमध्ये प पू. श्री सिद्धेश्वर महास्वामींनी लावलेल्या वृक्षाच्या स्मरण दिनानिमित्य आयोजित हरिनाम सप्ताहात बोलताना हभप तुकाराम बाबा महाराज.
जत/प्रतिनिधी:- कोरोनासारखा कठीण काळातून आपण गेलो पण त्यापासून आपण काही शिकलो नाही की संकल्प केला नाही. ऑक्सिजनअभावी अनेकांना आपले नातेवाईक गमवावे लागले आहेत. कोरोनाचा काळ आठवा, वृक्षारोपन मोहीम हाती घ्या असे आवाहन चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा हभप तुकाराम बाबा महाराज यांनी केले.
.विजयपूर येथील प.पु. सिध्देश्वर महास्वामीजी यांनी संख येथील बाबा आश्रमाला भेट दिली तेव्हा त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्या वृक्षाचे स्मरण दिन व श्री संत सयाजी बागडेबाबा यांच्या तृतीय वर्धापन दिन सोहळयानिमित्य अखंड हरिनाम सप्ताह व विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बुधवारी हभप तुकाराम बाबा महाराज यांच्या काल्याच्या किर्तनाने सप्ताहाची सांगता झाली.
यावेळी मानविकार संघटनेचे संजय धुमाळ, वास्तुविशारद तज्ञ सरिता लिंगायत ताई महाराज, नारायण महाराज करांडे, मेजर मलाबादी, मानव मित्र संघटनेचे प्रशांत कांबळे, रामचंद्र रणशिंगे, अमृत पाटील जालाळ, शिवरात्र महाराज, खांडेकर महाराज, युवराज शिंदे महाराज, रामदास भोसले, शिव राठोड महाराज, राजू चौगुले, शिरसु कुंभार, निबोनी महाराज, चनाप्पा आवटी, बसु बागळी, पुंडलिक खोत, कृष्णा रजपूत संतोष कारागी, गंगास्वामी ऋषी दोरकर, शंकूतला भिसे, सुवर्णा राठोळ, बाळु आवटी, लिगुडा भोसले, संखचे ग्रामपंचायत सदस्य डाँ सागर शिवगोंडा पाटील, मनोहर पाटील, शिवलिंगेश्वर चंद्रशेखर बालगाव आदी उपस्थित होते.
जत तालुका दुष्काळी तालुका. या तालुक्याच्या शेवटच्या टोकापर्यत पाणी मिळायला पाहिजे म्हणून आपण श्री संत बागडेबाबा पाणी संघर्ष समितीच्या माध्यमातून संघर्ष उभारला,संख ते मुंबई मंत्रालय पायी दिंडी काढली. रक्त घ्या पाणी द्या अशी आर्त हाक शासन, प्रशासनाला दिली. जत पूर्व भागाला पाणी देण्यासाठी आज विस्तारित म्हैसाळ योजनेचे गतीने काम सुरू आहे. जतकरांचे हे मोठे यश असल्याचे सांगून हभप तुकाराम बाबा महाराज म्हणाले, प.पू. सिध्देश्वर महास्वामीजी यांच्या हातून लावलेले झाड आज वाढत आहे. आजच्या काळात झाडांचे महत्व कळले असले तरी त्याचे अनुकरण होत नाही. शासन, प्रशासन, सामाजिक संघटनेनी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले.
यावेळी प्रशांत कांबळे यांनी हभप तुकाराम बाबा महाराज यांनी मानव मित्र संघटतेच्या माध्यमातून केलेल्या सामाजिक कार्याची माहिती दिली.