Thursday, November 27, 2025
Latest:
शेती विषयी

कान्हापुरी येथील देशमुखवस्ती–चव्हाणवस्ती ते कान्हापुरी रस्ता सुधारणा कामाचे भूमिपूजन आमदार अभिजीत पाटील यांच्या हस्ते संपन्न

Spread the love

रस्ता जनतेच्या जिव्हाळ्याचा विषय – आमदार अभिजीत पाटील

कान्हापुरी येथील देशमुखवस्ती–चव्हाणवस्ती ते कान्हापुरी रस्ता सुधारणा कामाचे भूमिपूजन आमदार अभिजीत पाटील यांच्या हस्ते संपन्न

प्रतिनिधी –

माढा मतदारसंघात विकासकामांना गती देण्याचे माझे प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत, असे प्रतिपादन माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजीत आबा पाटील यांनी केले.

पंढरपूर तालुक्यातील कान्हापुरी येथील देशमुखवस्ती–चव्हाणवस्ती ते कान्हापुरी या रस्त्याच्या सुधारणा व डांबरीकरणाच्या कामाचे भूमिपूजन आज आमदार अभिजीत पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या प्रसंगी ग्रामस्थ, कार्यकर्ते व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या रस्त्यामुळे शेतकरी, विद्यार्थी, व्यावसायिक तसेच ग्रामस्थ यांना मोठा दिलासा मिळणार आहे. पावसाळ्यात होणारी दळणवळणाची अडचण दूर होऊन वाहतूक व्यवस्था सुलभ होईल. ग्रामस्थांच्या दैनंदिन जीवनमानात बदल घडवून आणणारा हा रस्ता विकासाच्या नव्या टप्प्याची सुरूवात करणार आहे.

यावेळी आमदार अभिजीत पाटील म्हणाले की, “रस्ता हा जनतेच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. मतदारसंघातील प्रत्येक भागात दळणवळण सुधारून लोकांच्या दैनंदिन सोयीसुविधा वाढविणे हेच माझे ध्येय आहे. विकासकामे ही केवळ घोषणा न राहता प्रत्यक्षात जनतेच्या दारापर्यंत पोहोचली पाहिजेत. त्यासाठी माझ्याकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.”
या भूमिपूजन सोहळ्यात ग्रामपंचायत पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून आमदार पाटील यांच्या विकासाभिमुख कार्याचे कौतुक केले.

यावेळी मोतीराम गोसावी, माजी सरपंच कालिदास चव्हाण, सागर कांबळे, मारुती चव्हाण, हरिदास चव्हाण, विठ्ठलचे संचालक दत्तात्रय नरसाळे, बालाजी शिंदे, जीवराज मोरे, शरद मोरे, गणेश जाधव, बाळू बैरागी, प्रेम चव्हाण, दयानंद शिंदे, स्मिता पाटील माजी सरपंच भारत शिंदे, सोमनाथ शिंदे, माजी सरपंच मधुकर शिंदे, रशीद देशमुख, दादा शिंदे यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *